OPINION

बागळेने अभ बर्तकांना चालू चर्चेतून हाकलून दिलं... !
.
कुठल्याही घटनेवर आपलं काहीतरी मत असावं, त्यामुळे ते बनवण्यासाठी आम्ही (आदरार्थी मी) स्वतःची एकसदस्यीय समिती नेमली. त्याचा तोंडी अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.
.
वर्तकांनी आझाद मैदानांवर झालेल्या आंदोलनाबद्दल अतिशयोक्ती अलंकार वापरुन एक मोठ्ठी पुडी सोडली... जी जरा जास्त झाली... सनातनवर, हिंदूंवर पेटलेल्या वाळेला आयतीच नाडी हातात मिळाली... वाळेची गत आधीच म.. त्यात म प्यायला... त्यात विंचू चावला टाईप आहे... चॅनेलचा टिआरपी डोंबलाइतका पण नाही... भरीस भर त्या खवड्याला कुठल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्याही मिळत नाहीत... त्यामुळे सदैव piles झाल्यासारखा चेहरा घेऊन फिरणाऱ्या नानाला वर्तकाच्या रुपाने आयतीच शिकार मिळाली... आणि तो बर्तकांवर फुल्ल चढून बसला... परीणामी : इज्जतीचा पंचनामा करुन बर्तक बाहेर पडले..
.
बर्तक हा माणूस त्याहून भंपक... कुठे काय बोलावं याची जराही अक्कल नसलेला... कशाचंच गांभिर्य नसलेला.  दाभोळकरांच्या श्रद्धांजली सभेत या माणसाने दात काढले होते... मुद्दा भलेही योग्य असेल, पण प्रक्षोभक बोलून, दोन चार जास्तीच्या पुड्या सोडून हा माणूस स्वतःचं हसं करुन घेतो...
.
निष्कर्ष : वाळूच्या डोक्यावर परीणाम झाला आहे, सहसा त्याला कुणी सिरीयसली घेत नाही. बर्तकपण त्याच वाटेवर आहेत. !
(नावं समजून घेणे.)
सनातनचे पुनाळेकर व्यवस्थित आणि अभ्यासू वाटतात.
.
अहवाल संपला !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved