Why Burns Ravan ??

रावण दहन या प्रकाराचा आधीपासून मी निषेध करतो... बुराई पे अच्छाईकी जीत वगैरे गोष्टी ठिक, पण रावण जाळण्याचं लॉजिक मला अजुनही कळलं नाहीय...
.
रावण-राम हे पौराणिक पात्र आहेत. जे एका कथेच्या स्वरूपात आपल्यासमोर येतात... त्या कथेत शेवटी रामाने रावणाचा वध केला, रावणाने माफी मागितली, रामाने माफ केलं - विषय संपला ! पुन्हा पुन्हा दरवर्षी रावणाच्या नावाने शिमगा करायचा आधिकार कुणी दिलाय ?
आपण त्या रावणाच्या समोर उभं राहणाच्या तरी लायकीचे आहोत कां ? की स्वतःला राम समजतो ?
.
पौराणिक कथांतून चांगलं ते घ्यायचं, बस ! रावण प्रचंड शक्तीशाली, बुद्धीमान, शिवभक्त व्यक्ती होते ! NoOne is 100% Pure !! ना रावण - ना राम ! शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी रामायण घडलं होतं ! रामायणातून राम-लक्ष्मण-रावण -कुंभकर्ण-हनुमान यांच्यापासून घेण्यासारखं खूप आहे... दशानन तर अष्टग्रंथी होते !... मूळात "रामायण" हे राजकारण आहे - राम-रावण या दोन राजांमधील युद्ध ! एकाचा विजय झाला, एकाचा पराभव ! त्यामूळे रावणाचा असूर म्हणून प्रचार मुर्खपणा आहे !
.
बुराई पर अच्छाई करायचं तर व्यसनी, बलात्कारी, नतद्रष्ट, वायफळ, देशद्रोही लोकांचे पुतळे जाळा ! १ वर्षात ही नालायक लोकं ठिकाणावर येतील...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved