Anna Hajare Protest Rally

अण्णा आंदोलन
मागच्या वेळी मिडीयानं उचलून धरलं ...
कारण देशात काँग्रेसविरोधी लाट होती, भयाण परीस्थिती होती... भ्रष्टाचाराला लोकं कंटाळले होते...
त्यामुळे
- देशभर समर्थनाचे मोर्चे निघाले
- अण्णा हिरो झाले
आंदोलन हिट झालं
- टाईम्सवर फोटो झळकला...
- व्हाईट हाऊस फिरून आले...
पद्मची सोय झाली...
पण त्यातून केजरीवाल / आप / जन्माला आलं...
पाटकर-बेदीचं दुकान बसलं..
तो दिल्लीचा मु मं, अण्णा बॅक टू राळेगण !
त्या आंदोलनावर अण्णांनी व्हिआयपी पाच वर्ष काढली... !
..
मोदीलाटेवर कॉंग्रेस पडलं... भाजपा आलं...
अण्णांना वाटलं आपलंच कर्तुत्व सिद्ध झालं,
अण्णा स्वतःला आधुनिक राष्ट्रपिता वगैरे समजू लागले...
सरकारला सल्ले देणं, लूडबूड करणं सुरु झालं...
पहिलं वर्ष सरलं,
सरकारने कोललं...
आता परत लोकांसमोर यावं, विसरलेल्या लोकांनी ओळखावं, दबदबा तयार व्हावा अशी इच्छा होणारंच...
अण्णा परत आले दिल्लीला ...
..
पण...
यावेळी पत्रकारही फिरकले नाही...
ना मोठ्ठ्या मंडपात गर्दी दिसतेय...
ना लोकांना इंटरेस्ट आहे...
..
ओव्हरऑल आंदोलन फ्लॉप झालं...
कारण
मोदी सरकारबद्दल लोकांमध्ये रोष नाही. उलट समर्थन आहेत...
त्यामुळे सगळं आलबेल असतांना येड्यांच्या नादी लागून जनतेला भिकेचे डोहाळे लागत नाही.. !
त्यात हार्दिक समर्थन मिळालं तिथे तर सगळंच संपलं !
...
असो
दोन मिनिटाचंकां होईना, मराठी तर मराठी चॅनेल :
पण फुटेज दाखवा...
तितकंच अण्णांचंही समाधान -
असंही कुणी फिरकलं नाही तर दोन दिवसांत आंदोलन गुंडाळलं जाईल !
..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved