Financial Year 2018-2019

३१ मार्च २०१८...
आर्थिक वर्ष २०१७ - २०१८ चा शेवटचा दिवस... उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष... !
..
या वर्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत क्रांती केली, आणि नवी अर्थव्यवस्था जीएसटीच्या रुपाने लागु झाली... बहुमत असल्याने विनाअडथळा संसदेच्या दोन्ही सभागृहात मान्यता मिळवून १ जुलै २०१७ च्या मध्यरात्रीपासून जीएसटी सिस्टीम आली - आणि अभूतपूर्व गोंधळाच्या दोन- तीन महिन्यांनंतर रुळली... अजूनही लोकं शिकताय... !
नोटबंदीनंतर अवघ्या सात महिन्यांतच सरकारने जीएसटीच्या रुपाने दुसऱ्या गालात मारली असं वाटत असतांना - "जरी आता जोरात लागली वाटत असलं, तरी रुळल्यानंतर नाजूक हातांनी गाल ओढल्याचा -  :-* केल्याच्या फिल येईल", हा युक्तीवाद वर्षाखेरीस खरा होतांना दिसतोय...
त्यामुळे
- जीएसटी समजावं, रुळावं आणि पटावं ही येत्या आर्थिक वर्षासाठी महत्वाची शुभेच्छा क्र. एक.
..
नीरव मोदी, विजय मल्या यांसारख्या अनेकांनी पीएनबी, एसबीआयसारख्या तगड्या बॅंकांना गंडवलं...
बँक अजुनही धक्क्यात आहेत...
- झालं गेलं गंगेला मिळालं ... जे गेले ते गेलेच ...
यावर्षी कुणी तसा नवा हत्ती न लागो,
ही आर्थिक वर्षासाठी महत्वाची शुभेच्छा क्र. दोन.
..
भारताचा जीडीपी ७.२ % आहे -
जागतीक स्तरावर नॉमीनल रँक ७ आहे.. (यूएसए क्र. १)
आणि purchasing power parity भारत रँक ३ वर आहे, (चीन क्र. १)
त्यात सुधारणा होवो,
जीडीपी किमान ९%+ पर्यंत जावो,
..
निफ्टी १२००० क्रॉस करो,
इन्व्हेस्टमेंटचे उत्तमोत्तम रिटर्न्स मिळो..
..
या नवीन वर्षात,
कॅशलेसवर भर द्यावा,
म्यूचुअल फंडस् बद्दल अक्कल यावी -
गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्न वाढीस जावे..
पैसा मोठा व्हावा... !
..
अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांना -
Businessmen, Sellers, Tax Payers, Researchers, Analysts, Employees, Agents, Bankers, Regulators, Service Providers, Investors, Professionals यांना
हे अर्थसंवत्सर २०१८ - २०१९ Value Enriching आणि Prosperous व्हावे ही सदिच्छा.
-
तेजस कुळकर्णी
(टि. के. गृप, अंधेरी इस्ट, मुंबई)
- TK Technology and Research Pvt. Ltd.
- TK Consultancy Services Pvt. Ltd.
- TK Education Pvt. Ltd.
- TK Media and Production Pvt. Ltd.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved