राम आणि गाणी...

राम आणि गाणी...
कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांना दोन भुवयांच्या मध्ये मन स्थिर व्हावं अशी नितांत शांतता... ! त्यांना फक्त माहौल हवा, राग - त्याचे समयचाक्राचे नियम त्या गाण्यांपाशी गप्प उभे राहतात, आणि केवळ ती गाणी - शब्द, संगीत, भाव निखळ आनंद देऊन जातात... !
..
राम !
गोंदवलेकर महाराजांचं मंदीर, गजानन महाराजांचं मंदिर...
कुठेही जा - "श्रीराम" हा त्रयाक्षरी जप एक लयीत दिर्घ आवाजात सुरु असतो...
ना चाल, ना वाद्य...
तरीही आपण त्या शांततेशी क्षणात एकरूप होतो...
श्रीराम जयराम जय जय राम ... किती शक्ती देतं ...
..
गीत रामायण तर रत्न म्हणावं...
रामाचं जीवन गदिमांनी गीतात बांधलं, बाबुजींनी तितकंच ताकदीचं संगीत दिलं...
आजही दुपारी १२ वाजता प्रत्येक मंदिरात "राम जन्मला गं सखे" सुरु असेल...
लग्नात स्वयंवर झाले सितेचे... किंवा दिवाळी पहाट मध्ये राम अयोध्येचा राजा ... ही गाणी आजही मानबिंदू आहेत...
..
रामावरची मराठी भावगीतंही साखरेसारखी गोड आहेत.
रामा रघुनंदना ही आर्त साद, उठी श्रीरामा ही भूपाळी ... राम होऊनी राम गा रे...
एकापेक्षा एक आहेत...
..
अयोध्येत कारसेवा नावाची सिडी मिळते.
त्यात हिंदी चित्रपटांच्या चालीवर रामाची गाणी आहेत... पाचच गाणी, गुढीपाडव्याच्या रॅलीत ऐकून बघा...
मै निकला ओ गड्डी लेके च्या चालीवर बांधलेलं "मंदिरको है बनाना, वादे को है निभाना..."
हम आपके है कौन च्या चालीत "जय हो राम... जय जय जय हो राम..."
तेरा मेरा प्यार अमर च्या चालीत, श्रीराम जयराम जयजयराम... दो अक्षरका प्यारासा नाम..." ..
राम नाम मे जादू एैसा... राम नाम मन भाये रे
मन की अयोध्या तब तक सुनी जब तक राम ना आये रे ...
चित्रपटांमध्येही : रामजी की निकली सवारी, हे राम .. हे राम ही गाणी, बनायेंगे मंदिर... निव्वळ अप्रतिम...
...
तुलसीदासांनी लिहीलेलं रामायण,
किंवा प्रचंड शक्ती असलेली रामरक्षा...
ते गाणं नव्हे, पण म्हणतांना शरीरात निर्माण होणारी उर्जा अद्भूत असते... ती ओवी, ते मंत्र वातावरण सकारात्मक करतात ...
मग मंगल भवन अमंगल हारी असेल किंवा रामो राजमणी सदा विजयते...
...
लता मंगेशकर, पंडीत भिमसेन जोशी यांनी गायलेलं
"राम का गुणगान करीये..."
हे भजन जरी दोघांचं असलं तरी ते दोघांनी एकत्र येवून रेकॉर्ड केलेलं नाही -
लतादिदी पंडीतजींना म्हणाल्या : मै आपके सामने कैसे गाऊ ?
पंडीतजीही मोठ्या मनाचे : मै आपके साथ कैसे गाऊ ?
या महान गायकांचा स्पर्श झालेलं ते भजनही सुंदर आहे...
"राम का गुणगान करीये..
रामकी भद्रताका सभ्यताका ध्यान धरीये..."
..
रामनामाने दगडं तरंगले,
हे तर शब्द आहेत... रामनामाचा स्पर्श झाल्याने शब्द न शब्द, प्रत्येक गाणं मंत्रमय झालंय, पवित्र झालंय....
फक्त लयीत "श्रीराम" म्हणुनही त्यात पावित्र्य येतं, तितकाच गोडवा येतो...
गीतरामायण ऐकतांनाही तेच जाणवतं ...
रामनामाचा महिमा ! सगळीकडे राम... !
...
म्हणून एका भजनात म्हणलंय :
जैसे सुरजकी गरमी मे जलते हुये तन को मिल जाऐ सरोवरकी छाया
वैसाही सुख मेरे मन को मिला है मै जब से शरण तेरी आया मेरे राम...
..
जय श्रीराम !
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved