मला भेटलेले नग : १
तीन महीने काम केल्यानंतर काय डोकं फिरलं माहित नाही, एक मुलगा काम सोडून गेला... जातांना राजीनामा व्हॉटस् अॅप वर पाठवला... तो पण सेंटी ... पे रोल वर असलेला माणूस.. अचानक काय झालं ? तर तोंड दाखवायलाही तयार नाही ... "सर या महिन्याची सॅलरी पाठवा ना..." म्हणुन त्याने दहा - बारा फोन मेसेज केले... !
"चार्ज हॅन्डओव्हर कर, नीट राजीनामा दे...'' तर इग्नोर... !
मग ब्रह्मास्त्र काढलं... एचआरला बोललो - त्याने चार्ज हॅन्डओव्हर केल्याशिवाय एनओसी द्यायची नाही, एनओसी शिवाय चेक निघणार नाही... बस ! मग मी दिवसभर फोन उचलला नाही...
झकत ऑफीसला आला - प्रोसेस केली... त्यात साहेबांचं रेकॉर्ड आणि परफॉरमन्स एकदम पूअर दिसलं ...
टार्गेट ३७ टक्के, सुट्टया, ऑफीसमध्ये दोनवेळा वादही घातलेले... कामात अक्ष्यम्य कुचराई ...
आणि यासाठी एचआरनं त्याला फटकावलं होतं..
"थोबाड न दाखवण्यामागचं हे एक कारण कां ?"...
फाईन लाऊन उरलेल्या रकमेचा चेक दिला ...!
... काल फोन आला : सर ६ महिन्यांचं exp लेटर हवंय ....
- मी सरळ नाही सांगितलं... तीन महिने काम केलंस ते दिलं... आता नाही !
दोन तासांनी परत फोन ... मी काम केलंय ... हे करेल ... ते करेल वगैरे रुड पोकळ धमक्या...
- xच्या ठेव ठेवलीयकां ६ महिने ? धमक्या कुणाला देतो ? प्रिवीयस एम्प्लॉयमेंट व्हेरीफीकेशन करता तुझ्या xला फोन करतील कां ? ... इकडून पिन मारली तर तिकडे तुझ्या xवर लाथ मारुन हाकलतील...
- फोन बंद !
नंतर सॉरीचा मेल, मेसेज !
..
नग टाईप लोकं नशीबाने भेटतात... कधी कधी असे नग्स पाचवीला पुजलेय की काय असंही वाटतं... नग भेटण्याचा सिझन असावा असा आठवडा गेला, आणि एकत्र लिस्ट बनवल्यावर आपण तऱ्हेवाईक माणसांना भेटून आलोय याची जाणीव झाली... हा पहीला... !
#नग