लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...
१. तुम्ही शक्य तितकं "ध्यान" किंवा बावळट दिसावं याची ती काळजी घेते...
गेल्या १५ दिवसापर्यंत मी ज्या ड्रेसमध्ये हॅन्डसम दिसत होतो, तो ड्रेस अचानक घालू न देणं, काळाच चष्मा लाव, चिपकू तेल लावून भांग पाड,  सॅन्डल्सच घाल ... अश्या गोष्टींची गोड बोलून / रागावून सक्ती करणं ही बायकोगिरी आहे...
ही बायकोगिरी बाहेर जातांना तिव्र होते...
तिच्या मैत्रिणींकडे जातांना तर प्रकर्षाने !
..
२. बाजारात जावंच लागतं...
इडली-सांबार खायचाय की पराठा ?
इडली सांबार... मग बाजारात जावं लागेल...
- तू आणि मम्मा जा ना गाडी घेवून... मला कंटाळा येतो तिथे...
- मग मला पण कंटाळा येतोय... खिचडी करते...
चल बाई चल...
खिचडी करते ही धमकी असते, तिला घाबरून आपण बाजारात जायला तयार होतो...
..
३. गाडीवर -
तिथे गेल्यावर गाडी पार्कींगमध्ये लावून तू जाऊन खरेदी करून ये - मी हॉटेलवर चहा घेतोय...
हे मी ऐकणार नाही...
भाव ठरवतांना एक दोन रुपयाने काय होतं हे  बोलायचं नाही...
मला घाई करायची नाही, भाजीतलं तुला कळत नाही...
.. .... सुचना ऐकाव्या लागतात...
...
४. कुणी ओळखीचं भेटलं की मुद्दाम त्यांच्यासमोर नेऊन हाय- हॅलो केलं जातं...
"काय तेजा, चक्क बाजारात ?
तेव्हा - हो मग ! लग्न झालंय ना आता...
...
५. पिशव्या उचलाव्या लागतात...
पिठाचे डब्बे आणायचं महाभयंकर काम करावं लागतंय...
..
#ती_आणि_मी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved