Caller Tune

जियो फोनवर फुकट कॉलर ट्यून असते म्हणून लहान असल्यापासूनचं मोस्ट फेवरेट सॉंग "ससा तो ससा की कापूस जसा" सेट केलं... !!
...
बायकोच्या भावाने नेमका त्याच नंबरवर फोन केला,
बालगीताचा भलताच अर्थ घेवून अभिनंदनाची आवई उठवली... तसलं नाही काहीच सांगून तोंडाला फेस आलाय.
...
ऑफीसच्या स्टाफनं मला ससा खूप आवडतो समजून टेबलवर ठेवण्यासाठी सश्याचं टेडी दिलं... ते ठेवलं आणि एका प्रोजेक्टचा क्लायंट आला - "आर यू स्टिल प्लेयिंग विद धिस ?"... उचलून कपाटात ठेवावं लागलं...
...
दुरच्या मावशीच्या लहान मुलीनं ऐकलं आणि आवडलं म्हणून सारखं सारखं फोन लावून ते ऐकवणं सुरुय, आणि तिला डाऊनलोड केलेलं आवडत नाही - कॉलवरच ऐकायला आवडतं... त्या पोरीला मध्यरात्री हुक्की आली तर ? ...
सेफ्टीकरता नंबर ब्लॉक केला...
...
आता कॉलरट्यून बदलावी लागणार नाही !
फुकट असली तरीही !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved