Habit
डायरी लिहिणं, शेड्युल बनवून काम करणं आणि स्वतःची एखादी सिस्टीम तयार करणं हि म्हणलं तर चांगली आणि म्हणलं तर वाईट सवय आहे... आणि सवय आपल्याला तिचा गुलाम करते याचा प्रत्यय आज आला...
माझा महिना मी १६ ते १५ तारीख असा असतो... आणि दर महिन्याच्या १५ तारखेला डायरी वाचून मी मागच्या महिन्याचं अवलोकन, पुढच्या महिन्यात करायची कामे वैगेरे प्लान करत असतो... गेल्या १२ वर्षात कधीही खंड न पडलेली हि गोष्ट आता सवय झालीय... झालं असं - काल १६ तारीख, म्हणजे नवीन महिना सुरु होण्याचा दिवस... ११ तारखेपासून कालपर्यंत माझा पूर्ण दिवस एका प्रोजेक्टच्या कामात जायचा... क्लायंट अमेरिकावासी असल्याने नेमकं रात्री ८ ते सकाळी ४-४:३० पर्यंत ऑफिस किंवा घरूनही असलो तरी ऑनलाईन असायचो... आणि डायरी, दिवसभराच्या नोंदी पेंडिंग राहत होतं... अगदी दर महिन्याच्या १२ तारखेला पुढच्या महीन्याचं प्लान करतो ते सुद्धा झालं नाही...
काल नवीन महिना सुरु झाला... म्हणावं तसं कामाचं गणित बसत नव्हतं... काय करू, कुठून सुरुवात करू उमजत नव्हतं... आणि ११ पासून डायरी पेंडिंग असल्याने मनात चुकलं चुकलं वाटत होतं... अगदी रोजचे नित्यक्रम करतांनाही गडबड गडबड होत होती... येऊन जाऊन मन ११ वर थांबायचं... गडबड समझी, आज वेळ मिळाला तर आधी ते अपडेट केलं, चालू महिन्याचं पूर्ण प्लान केलं... नेहमी करतो तसं ते इम्प्लीमेंट केलं... आणि आता भूत मधून वर्तमानात आल्यासारखं वाटतंय...
सवय चांगली तेवढीच वाईट पण !