डोंबल्या
माझ्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या मुलाने त्याला मुलीकडची मंडळी पहायला येणार म्हणून मला आग्रहाने बोलावून घेतलं, जनरली - असे कार्यक्रम बोअर होतं म्हणून टाळलेले बरे - पण घोड्यावर चढणाऱ्या मित्राला पाठींबा द्यायला हवा... त्यातही कुणी मान दिला तर जास्त आढेवेढे न घेता गपगुमान मिरवून घ्यावं, दिवे ओवाळून घ्यावे असं साधं सोपं प्रिन्सीपल मी स्वतःसाठी पाळतो ( :-P ) अरेंज मॅरेज म्हणलं तर कुठे काय विचारावं याची त्या पोरांना अक्कल नसते - आम्हा लव्हमॅरेज वाल्यांचं तसं सोप्पं असतं,
त्यामुळे अनुभवाची खिरापत वाटायला अस्मादीक पोहचले ! आणि हाय व्होल्टेज तमाशा अनुभवायला मिळाला ... झालं असं :
...
मुलीकडची मंडळी पोहचली -
मुलगी, आईवडील, मामा आणि अजून एक दोघं ...
कार्यक्रम सुरू ... !
नमस्कार चमत्कार झाले,
आणि मुलाचा त्या मुलीच्या मामाने इंटरव्ह्यू सुरु केला...
काय करतात ?
शिक्षण कीती ?
फ्लॅट स्वतःचा की रेन्टवर ?
पॅकेज किती ?
जॉब फिरस्ती की ऑफीस ?
लग्नानंतर कुठे राहणार ?
शिक्षण कुठे झालं ?
.. एमबीए केलंय !
मग कुठले विषय होते ? ...
भाऊ किती ? सोबत राहतात की वेगळे ?
.... .... ...
पोराचे वडील त्या प्रश्नोत्तरांना कंटाळले होते,
या मा.घा.ला संसार करायाचाय की पोरीला ? भ.. आला तसा सुरु पडलाय.... अशी कचकचीत कोल्हापूरी शिवी कुजबुजली...
..
मामा दमला... सुत्र मुलीच्या वडीलांकडे ...
"घरात म्हातारी माणसं किती ?"
- कां ? ... मुलाचे वडील !
- सहजच !
- तिघं .. माझे आईवडील आणि सासूबाई ... मुलाचे वडील !
- तुमच्याकडे राहतात की भाऊंकडे ?
- इथेच ! आमच्यासोबत...
- मुलीला तेवढा प्रॉब्लेम आहे हो... बाकी सगळं चांगलंय ! या तिघांची व्यवस्था भाऊंकडे करायची ना.....
...
त्यांचं बोलणं अर्धवट होतं न होतं तोच मुलाचे वडील उठून उभे राहिले ...
मुलीच्या वडीलांकडे बोट करून ...
उठ... चल निघ इथून ... गेट आऊट... निघ निघ ...
म्हणत सणकावलं...
तू, तुझी बायको आणि मामाकडे बोट करुन हा "डोंबल्या" पण म्हातारा होणारे ना उद्या... त्यांचा पण प्रॉब्लेमच असेल मग .... फूट इथून भ ... निघ....
हे तिघं इथेच राहतात ! इथेच राहतील ...
म्हणत त्यांना पुढचा शब्द बोलूही न देता हाकलून दिलं ...
...
घरातून निघतांना त्या मुलीच्या वडीलांचा, मामाचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा झाला होता...
मुलाचे वडील गेटवर उभे राहून ते जाईपर्यंत त्यांना ऐकू जाईल अश्या पहाडी आवाजात वाग्बाण सोडत होते ... !
...
हॅटस् ऑफ मॅन...
जेथे वृद्धत्वाचा होतो सन्मान तेथेच नांदते कृतज्ञता...
अन्या तुला यापेक्षा चांगली बायको मिळेल ...
उद्या आम्ही म्हातारे झाल्यावर तुच एकटा सांभाळणारा आहे बाबा ...!
...
चांगला अनुभव आणि मराठी भाषेला मिळालेला नवा शब्द "डोंबल्या" चघळत बाहेर पडलो ... !
चांगली माणसं आहेत जगात अजुन !