"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !...
"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !... ... दि. २० एप्रिल २०१८ - कसं वागावं, कुणाकडे बघू नये, कसं रहावं, काय केल्याने भलं होईल, काय न केल्याने तुझ्यामागे भिती राहणार नाही ... या प्रश्नांचं उत्तर - "खाली मुंडी घालून गपगूमान ऐकावं त्यातच भलं असतं" या जागतिक मंत्राचा अनुग्रह मिळाला - आणि याच दिवशी आयुष्यात नव्या गुरूंचं पदार्पण झालं... सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी ... ... "तेजसराव सांभाळा"... हे पाठवणीच्या वेळी सासूबाई म्हणाल्या होत्या.... त्यात तेजसराव आणि सांभाळा मध्ये साइलेंट "तुम्हाला स्वतःला" हे होतं, याची फोड सासरेबुवांनी हल्लीच केली... आपल्या माणसाची आपल्याला गॅरंटी असते (पक्षी : त्यांची मुलगी) - म्हणून तुम्हाला सावध केलं..." - आपल्याला लाभलेली गुरु जबरदस्त आहे याची खात्री पटली ....! ... आई, पप्पा, आजोबा, शाळेतले शिक्षक, स्वतःचे अनुभव या सगळ्यांसह नवी गुरु लाभली आहे... "अहो, ऐक ना" म्हणाली की सरळ खुर्चीवर बसायचं आणि मिळणारं ज्ञान घ्यायचं इतकं सरळ सरळ शिक्षण सुरु आहे ! Jokes apar...