RIP Dr. Hathi

तारक मेहता मधल्या डॉ. हाथीचा रोल करणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचं ऋदय विकारानं वोक्हार्ट मध्ये निधन झालं. रोजच्या बघण्यातला माणूस असा अचानक निघून जाणं खूप चटका देणारं असतं... 
.
प्रचंड अवजड शरीर सांभाळत अभिनय, नृत्यात असणारी त्यांची चपळता, संवादफेक, टायमिंग या गोष्टीला तोड नव्हती... कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनी हे डॉ. हाथी या पात्राचा रोल करायचे, पण निर्मल सोनी यांचा करार संपल्यावर आझाद आले आणि त्यांनी डॉ. हाथी म्हणून आपली जागा प्रेक्षकांच्या मनात, घरात पक्की केली. वेळेवर येणं, नियमितता आणि सहकारी कलाकारांना हसत खेळत सांभाळून घेण्याची हातोटी यामुळे कुमार आझाद यांनी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली होती... 
.
एखादा माणूस दररोजच्या बघण्यातला असेल आणि त्याचं अचानक जाणं हे जरी खूप चटका देणारं असलं तरीही, जाण्याचं कारण हे देखील धडा देणारं असतं... कवी कुमार यांचं अवाढव्य शरीर हे त्यांची ओळख होती, त्यावरच त्यांना अनेक भूमिका मिळाल्या - आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या फुलवल्या, तरीही - त्याच अवाढव्य शरीराने त्यांचा घात केला... त्यात सिगरेटची सवयही जीवघेणी ठरली !
..
शेकडो किलो वजनाचं शरीर, शूटींगमधली दगदग - पॅक शेड्यूल आणि त्यामूळे होणारी आरोग्याची हेळसांड... नाही म्हणलं तरी शरीराच्या मानानं जड जाणारच, ग्लॅमर वागवायला मजा येते... कधीतरी व्यसनं जडतात... पण शरीर उत्तर देतंच... एका मर्यादेबाहेर वजन गेलं की ऋदयविकार, मधुमेह या गोष्टी मानगुटीवर बसतात.. आणि एखादा दिवस असा वाईट उजाडतो... कार्डीयाक अरेस्ट, हार्ट अटॅक या गोष्टी आपल्याला कधीही गाठू शकतात याचीही जाणीव त्या माणसाला असावी... 
काळजी घेणं फक्त आपल्या हातात असतं !
..
शेवटी, जे झालं ते वाईटच झालं ... 
चांगला माणूस गेला ...
यापुढे तारक मेहता बघतांना ते खूप जाणवेल ... !



© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved