Opportunity only knocks once : Business Lesson

माझी कंपनी टिके टेक्नॉलॉजी मध्ये एक प्रोजेक्ट २०१६ च्या शेवटी आम्ही दोघांनी सुरु केला... तेव्हा कंपनी सुरु करुन अवघं एक वर्ष झालेलं, तितकासा अनुभव नाही, छोटासा प्रोजेक्ट मिळाला तरी आकाश ठेंगणं व्हायचं... आणि त्यात तो प्रोजेक्ट म्हणजे तेव्हाच्या मानानं उंच उडी म्हणावा तसा... तेव्हा संपूर्ण कंपनीची टिम साईज होती ६ ... ! माझा एक मित्र ती कन्सेप्ट घेऊन आलेला... कन्सेप्ट आवडली... मिटींग झाली, माझे ६०- त्याचे ४० मध्ये ठरलं.. मी, तो मित्र आणि डेव्हलपमेंटचे दोघं अश्या चौघांच्या टिमनं त्या प्रोजेक्टवर काम करणं सुरु केलं ...!
...
स्वतःचा कुठलाही लाँग टर्म प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्शन म्हणा हवं तर (दुसऱ्यांचे प्रोजेक्टस् घेऊन त्यावर काम करणं नाही, हे स्वतःचं...) सुरु झाल्यानंतर किमान ६-८ महिने प्रॉफीट दूर, अडकवलेल्या कॅपिटलचं तोंड दिसत नाही... प्रॉफीट वगैरे निघत किमान वर्ष जातं... लाँग टर्म प्रोजेक्ट मूळातच लाँग टर्म असल्याने त्याचं यश-अपयश कळायला किमान एखादं वर्ष लागणार हे गृहीत असतं -
एखादं बाळ जन्माला घातल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने शर्ट-पॅन्ट घालून ऑफीसला जावं आणि पैसे कमवावे हे जितकं अशक्य तितकंच एखादा प्रोजेक्ट सुरु केल्यावर त्यातून लगेच प्रॉफीट मिळावा हे ही अशक्यच ! .. वेळ देणं हा त्याच्या डेव्हलपमेंट मधलाच एक भाग असतो, -
..
तर, प्रोजेक्ट सुरु झाला... दिड महिन्यानं लाँच केला... इथपर्यंत सगळं आलबेल होतं... पुढे तीन महिने व्यवस्थित सुरु होतं - अॅज कंपनी ओनर माझ्या दृष्टीनं खरं तर ग्रेट गोइंग ... कॅपीटल रिटर्न्स होत होते, फक्त प्रॉफीट दिसायला अजून थोडा वेळ लागेल असं गणित सांगत होतं...
..
एक दिवस तो मित्र सकाळीच ऑफीसमध्ये आला...
- तेजस, प्रॉफीट नाहीय तर इच्छा नाहीय मला यावर काम करायची -
- बरं. मग ?
- आपण कंटिन्यू करु शकत नाही ...
- विचार कर, सहा महिन्यांत आवरलं जाणार नाही या लेव्हलला येईल हे... जर पेशन्स ठेव ...
- नाही... तुला हवं तर तू कंटिन्यू कर, मला फ्री कर...
- ठिक आहे ...
आम्ही सहमतीने अॅग्रीमेंट वाइंडअप केलं...
त्याचा एक भाग म्हणून हिशोब करत त्याचे ४० टक्के शेअर्सही मी विकत घेतले - आणि तो प्रोजेक्ट १०० % माझा झाला..
वर्षभर त्याच्या गतीने चालला... थोडा थोडा प्रॉफीट दिसायला लागला...
..
इथेच संपलं नाही...
थांबा !
..
टिके-टि चा एक प्रोजेक्ट म्हणूनच तो सुरु आहे,
दरम्यान इतर काही चांगल्या प्रोजेक्टस् मूळे कंपनी वाढली -
गाड्यासोबत नळ्याचीही यात्रा झाली - कंपनीच्या प्रगतीचा थेट फायदा त्या प्रोजेक्टला झाला,
अपेक्षित वेळेत योग्य प्रॉफीट मिळत स्थिरसावर झाला...
आणि दोन महिन्यांपूर्वी त्याच संदर्भात बूस्टर ठरावं अशी अजून एक घटना झाली - त्याच प्रोजेक्टला तगडं असाईनमेंट मिळालं ...
...
इथेही संपलं नाही...
थांबा !
..
पुन्हा टिम मिटींग .... चार वजा एक बरोबर तीन ची टिम आता दहा वर आहे... त्यात या सकारात्मक बदलावर चर्चा झाली... भविष्याची रुपरेषा, आगामी प्रगती वगैरे बघितलं गेलं... आणि त्यात पहिल्यांदा तो मित्र दोन वर्षांपूर्वी ही कन्सेप्ट घेऊन आला तेव्हाची आठवण निघाली ...
आणि "ज्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं" हा अस्सल देशस्थी विचार अस्मादिकांस आला....
शंभरातनं २० जातील, पण मनाला समाधान तर लाभेल...
फोन केला -
"तुझी कन्सेप्ट, तु खरंच खुप मेहनत घेतलीस यांवर, आणि आता वाढलं तर मला एकट्याला ते खाणं योग्य वाटत नाही, ... तुझी इच्छा असेल तर पुन्हा जॉईन कर... एक्स्पांशन सुरुय, सहज अॅड करता येईल.." म्हणून सस्नेह निमंत्रणही दिलं...
- "दोन दिवसांत विचार करून कळवतो.."
दोनाचे आठ झाले - फोन नाही ...
मी परत फोन केला -
तर उत्तर आलं - "सॉरी यार, जमणार नाही..."
असून नसून फरक पडत नसल्यानं मनावरचं ओझं उतरवून मी आणि माझ्या टिमने एक्स्पांशन केलं,
आणि नव्या स्तरावर जाऊन तो प्रोजेक्ट सुरु झाला...
... हे घडलं साधारण एप्रिलच्या शेवटी...
दरम्यान मे आणि जून गेले ... सगळं व्यवस्थित सुरु होऊन रुटिन झालं...
आणि आज १४ जुलै २०१८ उजाडला...
...
सकाळी फोन :
"तेजा, मी रिजॉईन करतोय... आजच मिटींग कॉल कर ..."
- "सॉरी यार, आता जमणार नाही... गेली वेळ..."
- "कां ? I was 40 % share holder of this project.."
- "So What ? You were... not you are !" मी चाळीस टक्के शेअर्स विकत घेतलेत, अॅग्रीमेंट वाइंडअप झालं... आणि तो प्रोजेक्ट आता थर्ड पार्टी वेंडर्स नाहीय तर टिके टेक्नॉलॉजी प्रा. ली. चा ऑफीशिअल आहे... तुला
जेव्हा वेळ दिला तेव्हा तू भाव खाल्ला...."
- "अरे पण तु म्हणालास ना ओझं वाटतंय ...?"
- ते समुद्रात फेकून आलोय... !
That's all !
...
दोन गोष्टी स्वतःकडूनच शिकलो -
तेच फुकट सल्ल्याच्या स्वरूपात वाटतोय -
(१) फायद्यासाठी गोष्टीला पुर्ण तयार व्हायला पुरेसा वेळ द्या ...
(२) संधी एकदाच मिळते -
किंवा इतरांना देतांनाही एकदाच द्यावी !

-
तेजस कुळकर्णी
टि. के. टेक्नॉलॉजी प्रा. ली.
अंधेरी (पूर्व), मुंबई

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved