सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती


सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष...
संयममूर्ती...!
..
कुठलंही अधिवेशन हे लोकसभा - राज्यसभा सभापतींच्या समोर घडतं... राज्यसभेचे पिठासीन सभापती हे मा. उपराष्ट्रपती असतात, तर लोकसभेचे सभापती हे निवडून आलेल्या सदस्यांतून निवडतात... !
..
१६ व्या लोकसभेच्या सर्वोच्च पदावर एक महनीय व्यक्ती आहेत... सुमित्रा महाजन... माहेरच्या सुमित्रा साठ्ये...
वय वर्ष ७५  ... !
सद्यस्थितीत भारतातील एकमेव महिला ज्यांनी सर्वात जास्त काळ लोकसभेत पद भूषवलं... १९८९ पासून आजपर्यंत त्या लोकसभेत आहेत...
..
ही म्हणावं तर सगळ्यांत संवेदनशील, धगधगती लोकसभा.. सरकार ते विपक्ष सगळेच अतंरगी...
पण या सदस्यांना फक्त नजरेच्याच धाकात ठेवण्याचं कसब त्या अनूभवातूनच असावं... वर्गात शिकवणाऱ्या बाई समोर आल्यानंतर सगळी पोरं जशी गप्प बसतात तसाच धाक सगळ्या सदस्यांना महाजनांचा वाटतो...
..
आज तर खरा कस लागण्याचा दिवस,
त्यातही सदस्यांना ओरडून शांत करणं -
रा.गा.ला कडक शब्दांत समज देणं -
अनावश्यक मुद्दे खोडून काढणं -
निःपक्षपणे, तटस्थपणे सगळं सांभाळणं -
हसत खेळत, मर्यादा सांभाळून सभागृह चालवणं -
आणि न थकता, न कंटाळता बसून सगळ्यांचे मुद्दे शांतपणे ऐकणं -
हे वाटतं तितकं सोपं नाही..
एका शरीराने वृद्ध, सुसंस्कृत स्त्री करता तर नक्कीच नाही !
..
सुमित्रा महाजनांना नियम, कलमं, सभागृहाची मर्यादा पुर्णपणे ज्ञात आहे !
.
सुमित्रा महाजनांमूळे सभागृह जिवंत असल्याची जाणीव होते !
लोकसभेचे ५४५ सदस्य हे नाकारणार नाहीत..!
..
राज्यसभेतही सभापती पदावर वेंकय्या नायडू बसल्यापासून जीव आल्यासारखं वाटतंय..
आज लोकसभेचं कामकाज बघतांना महाजनांविषयीचा आदर दुपटीने वाढला !
..
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved