Posts

Showing posts from March, 2020

Maharashtra Police's Shameful Behavior

एबीपी वर व्हिज्युअल्स दाखवतायेत औरंगाबाद, ठाणे वगैरेचे... साध्या वेषातले पोलीस जो दिसेल त्याला काठीने मारताय... कुणी लेडीज असेल, भाजी घेवून जाणारा माणूस, वयस्कर माणूस कुणालाही सोडत नाहीयेत... एक ४०७ मालवाहू गाडी होती, ज्यात कुठलंतरी आवश्यक सामान असेल... चालू गाडीची काच एका पोलीसाने काठीने फोडली... तो गाडीवाला जखमी होवू शकतो... कशाचीच पर्वा नाही... ... जो खरा टवाळखोर असेल तो ठीक, पण जो माणूस Genuine असेल, भाजी-दुध-किराणा-औषधं घेवून जाणारा असेल, पुणे-मुंबईत जे एकटे राहणारे अडकले ते काही सामान घ्यायला जाणारे असतील, ज्यांना ताप-सर्दी सोडून इतर आजारासाठी हॉस्पिटलला जावं लागणार असेल, एखाद्या माणसाचे जवळचे वृद्ध नातेवाईक आजारी असतील, काहीही इमरजन्सी असू शकते त्यासाठी बाहेर पडणं अत्यावश्यक असेल, त्यांना अडवण्यासारखं काय आहे ? आणि अडवलं तरी कारण ऐकून फक्त पॉवर आहे म्हणून काठीने मारायचं ? ... मूळात मुमंनी पोलीसांना प्रॉपर गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत. संचारबंदी-जमावबंदी यात ते स्वतः कन्फ्यूज्ड वाटतात, लोकं गोंधळलेली आहेत... आजारापेक्षा या तुघलकी गोंधळानेच उत आणलाय... ... कोरोना जाईल, सगळं ठीक होईल

Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे... त्यात रविवार ! पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा - घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या, चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका... घाबरून घाबरून रहा...! सतर्क रहा !... ... त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...! ... एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...! ... अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ? घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा... उदा. जाळं काढा, भांडी घासा... थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं, दाखवून दाखवून करायचं...! खुप केलं असं वाटायला हवं ...! दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे... कीव येईपर्यंत...! या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल ! .. (काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! .... आणि... . . थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...) ... - तेजस कुळकर्णी

#MaharashtraNeedsDevendra

# MaharashtraNeedsDevendra ... देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत... आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... ! ... देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती. ... रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती. ... आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजि

खाSSरे

#गोड_गोष्टी ... तेजू आणि माझं लेकरु तिच्या माहेरी सेलूला आहे... ते पुढच्या महिन्यात येतील... त्याला मी पंधरा - वीस दिवसांत भेटायला जातो... आणि कधी कधी माझे मम्मी पप्पा सुद्धा सोबत असतात...  लेकराला माझ्या पप्पांचा आवाज, स्पर्श खूप कळतो...  आणि कितीही रडत असला तरीही पप्पांनी त्याला एकदा हाक मारली की गप्प बसतो... हसतो...! रडत असला तर पप्पा त्याला "का रे बाळा ... का रडतोय ?'' हे म्हणतात... त्याला ते "का रे बाळा" एकदम ओळखीचं झालंय...! पप्पा बोलले की तो हाताने ये ये करतो..! ... आज लस देवून आणलेली तर एकदम गाढ झोपला होता - तेजूच्या कॉलनीत खारे शेंगदाणे वगैरे विकणारी गाडी आली, तो माणूस "खाsssरे" म्हणत ओरडत होता... ते "खाsssरे" गाढ झोपलेल्या लेकराच्या कानावर आलं... त्याला ते "का रे - का रे" ऐकू आलं, आणि वाटलं पप्पा आले... लेकरु खुश होवून हसायला लागलं... हाताने ये ये सुरु केलं ... तो आवाज जसा जसा कमी होत गेला तसं त्याला कळलं आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा कमी झालं... आवाज बंद झाला आणि लेकराने जोरदार भोंगा पसरला... ...

कोरोना : जागतिक संकट (साभार)

कोरोना विषाणू : मानवजातीवर सुटलेले ब्रम्हास्त्र.              सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती, शंभर वर्षांपूर्वी होत्या.  'विषाणू' हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात २८०००० अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर  माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे ७५० कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही. भले आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ व शक्तीवान मानत असू! ७

Corona Go... Go Corona...

माझ्या काही सवयी आत्ता कोरोनाला माझ्यापासून दुर ठेवण्यात कामी येतील असं दिसतंय... काही गोष्टी वजन कमी करणं, सुटलेलं पोट कमी करणं, गाण्याच्या परिक्षांच्या भितीने आवाज ठिकाणावर ठेवणं यासाठी केल्या. आणि काही गोष्टी ऑरा, जोतिष्य वगैरे सल्ले घेवून सुरु केल्या ज्या करणं आता सवयींचा भाग आहे... त्याचे रिजल्टस मी चेक केले नाहीत, पण फायदा नक्कीच झालाय...  (कुठलंही नुकसान झालं नाही...) एकप्रकारे स्वतःसाठी प्रोटेक्शन तयार झालंय... तुम्ही वापरुन बघा... झाला तर फायदाच होईल. नुकसान होणार नाही. ... कोरोनाची भिती ५० टक्के तरी टळेल... ... १. भिमसेनी कापूरचा वापर : कुणीतरी सल्ला दिला, भिमसेनी कापूर रोज घरी आणि ऑफिसमध्ये जाळला की नकारात्मकता निघून जाते... वातावरण शुद्ध होतं... बायकोने लगेच अंमजबजावणी केली... एक किलो भिमसेनी कापूर आणला, प्लास्टिकच्या डब्यात भरला, आणि रोज संध्याकाळी एक तुकडा जाळणं सुरु केलं...! याचा आकार कापरासारखा स्क्वेअर किंवा गोल वगैरे नसतो... शेपलेस असतो. साधा कापूर बहूतेक सातशे-आठशे किलो मिळतो, तर हा दोन हजार रुपये किलो... ! एकदम स्ट्राँग... डब्बा उघडला की त्याचा वास पुर्ण घ

तंद्री

माझं अडीच महिन्याचं लेकरू अख्खा दिवस-रात्र गाजवतंय... झोपता झोपत नाही... मी पंधरा दिवसातून दोन-तीन दिवस तिथे जातो - पण माझी बायडी त्याच्या सेवेत २४ तास असते... तो मोठ्या मुष्कीलीने झोपतो, आणि झोपला तेवढ्याच वेळात तिला जेवण वैगेरे आवरावं लागतं...  त्यातही तो उठून उठून रडतो, तर सगळं सोडून त्याच्याभोवती रहावं लागतं.  दोघांच्याही डोक्यात तोच तो राहतो... ... आत्ताची गोष्ट -  मोठ्या मुष्कीलीने तो झोपला, तिने मला फोन केला -  मी - झोपला का ? ती - हो.. हुश्श... आत्ताच झोपला...! मी - (मी Naturally एकदम हळू आवाजात बोलायला लागलो...) हा बोल मग... काय करतेय ? ती - तू का इतक्या हळू आवाजात बोलतोय पण ? मी - तो झोपलाय तर उठेल ना परत...  ती - आहो... तू फोन वर आहेस तर कसा आवाज जाईल ? झोपेत ए का तू ? ... बाळाच्या नादात काय काय होतंय.... तंद्रीत तंद्रीत राहतोय आम्ही दोघंही.

उधोजीची अयोध्यावारी

काल संजूरौत ४००-५०० कर्मचारी घेवून गेले, आज उठाराव तिकडे गेले, कालच्याच ४००-५०० लोकांनी संजूरौ सोबत उठारावचं स्वागत केलं, आणि त्याच लोकांच्या गर्दीसमोर उठारावने हिंदीत भाषण केलं... स्वतःला आणि खानदानाला उदबत्त्या ओवाळल्या, मोदी-शहांच्या नावे बोंबा मारल्या, रामाला आशिर्वाद दिला... संजूरौतनं पुन्हा पुड्या सोडल्या - झालं...! ... तिकडच्या ओरीजनल लोकांना या नाटकाचा ट फरक पडत नाही, ढुंकूनही बघत नाही... इकडची ओरीजनल लोकं टिंगल करतात... मोदी-शहा येडं समजून सोडून देतात... ... प्रचंड यशस्वी, प्रचंड गर्दीत दौरा आटोपला - उद्याची हेडलाईन !

ब्राह्मण अभिनेत्री आणि डहाकेची घाण

Image
डहाके - वाडकर मंडळी इंडस्ट्रीत उगवतात - जातात... ना यांच्या येण्याचं कौतूक ना जाण्याचं दुःख... आमच्या अंधेरी-गोरेगांवला किलोवर मिळतात ही मंडळी, मरिन ड्राईव्हला सिंगले ज्या आशाळभूत नजरेने कपाऱ्यात वाकत बसतात त्याच आशाळभूतपणे कुणी आपल्याला ओळखेल म्हणून खूप झालं तर फिल्मसिटीतल्या कँटीनमध्ये बसलेले असतात... किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये (लायकीनुसार)... कुणी फुकट विचारत नाही... म्हणून या चोंग्यांना असा उपद्व्याप करावा लागतो - ... बांद्य्रात एकदा आमिर खानची गाडी रस्त्याच्या एकदम मधोमध बंद पडली तेव्हा हॉर्न मारणाऱ्या एका टॅक्सीवाल्यावर त्याचा ड्राईवर उर्मटपणे आमिर खान की गाडी है म्हणून खेसकला - "आमिरकी गाडी है तो घर जाके चढ - यहा पब्लीकका टाईम खोटी मत कर..."' म्हणत टॅक्सीवाल्याने भरचौकात आमिरचं श्राद्ध घातलं होतं... आमीरची इतकी वर्ष आपटून ही गत - या झेमट्यांना कोण विचारतंय ... ? ... डहाकेचं स्टेटमेंट सिरीयस घेतलं तर - मूळात त्याला अक्कल नाहीय. - पण फरक हा आहे की - ब्राह्मण मुलींचे पालक त्यांना इंडस्ट्रीत उभं राहण्याची ताकद आणि विश्वास देतात... तिथे करीयर आपटलं

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved