Maharashtra Police's Shameful Behavior

एबीपी वर व्हिज्युअल्स दाखवतायेत औरंगाबाद, ठाणे वगैरेचे...
साध्या वेषातले पोलीस जो दिसेल त्याला काठीने मारताय... कुणी लेडीज असेल, भाजी घेवून जाणारा माणूस, वयस्कर माणूस कुणालाही सोडत नाहीयेत...
एक ४०७ मालवाहू गाडी होती, ज्यात कुठलंतरी आवश्यक सामान असेल... चालू गाडीची काच एका पोलीसाने काठीने फोडली... तो गाडीवाला जखमी होवू शकतो... कशाचीच पर्वा नाही...
...
जो खरा टवाळखोर असेल तो ठीक,
पण जो माणूस Genuine असेल,
भाजी-दुध-किराणा-औषधं घेवून जाणारा असेल,
पुणे-मुंबईत जे एकटे राहणारे अडकले ते काही सामान घ्यायला जाणारे असतील,
ज्यांना ताप-सर्दी सोडून इतर आजारासाठी हॉस्पिटलला जावं लागणार असेल,
एखाद्या माणसाचे जवळचे वृद्ध नातेवाईक आजारी असतील,
काहीही इमरजन्सी असू शकते त्यासाठी बाहेर पडणं अत्यावश्यक असेल,
त्यांना अडवण्यासारखं काय आहे ?
आणि अडवलं तरी कारण ऐकून फक्त पॉवर आहे म्हणून काठीने मारायचं ?
...
मूळात मुमंनी पोलीसांना प्रॉपर गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत. संचारबंदी-जमावबंदी यात ते स्वतः कन्फ्यूज्ड वाटतात, लोकं गोंधळलेली आहेत...
आजारापेक्षा या तुघलकी गोंधळानेच उत आणलाय...
...
कोरोना जाईल, सगळं ठीक होईल -
पण या कठीण काळात कोण माणूसकी दाखवतं आणि कोण हरामखोरी करतं हे दिसतंय...
...
काल संध्याकाळी आमच्या कॉलनीत एका हवालदाराने येवून एक किराणा दुकान बंद पाडलं... जे या एरीयातलं एकमेव दुकान होतं... आता काहीही घ्यायचं तर मुख्य पेठेपर्यंत जा ... तिथे सुद्धा पोलीसांची भिती घेवून... त्या आधी तुषारला घेवून हॉस्पिटलला गेलो - तिथे डॉक्टर सांगत होते... त्या डॉक्टरांनाही मेडीकल, लॅब बंद करण्यासाठी सांगितलं गेलं... जेव्हा त्यांनी जी-आर मागितला तेव्हा ते पोलीस गपचूप सटकले...
कोरोना दूर - हे अर्धवट माहितीवाले जास्त करताय...
ज्यांना Essential चा अर्थ कळत नाही असे.
...
जर असंच राहीलं तर कोरोना परवडला,
पोलीस आणि सरकारी फर्मानं आवरा म्हणायची वेळ येईल !
...
टिप : इटली प्रमाणे परवानगी सिस्टिम उभी करायला हवी... ज्याला जिथे जायचं त्याप्रमाणे यंत्रणेकडून परवानगी घेवून जायचं ! सगळं ठिकाणावर येईल !... पुण्यात केलंय तसं, सगळीकडे हवं !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved