#MaharashtraNeedsDevendra

#MaharashtraNeedsDevendra
...
देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत...
आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... !
...
देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती.
...
रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती.
...
आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजिल्ह्यात तपासणी केंद्र, मदतकेंद्र सुरु हवं होतं -
या सरकारमध्ये निर्णयाचा अभाव दिसतो, एक मंत्री निर्णय घेतो - दुसरा मंत्री तो निर्णय खोडून काढतो - तिसरा त्यावर भलतंच बोलतो... आरोग्यमंत्री रोज दिवसभर कॅमेरासमोर बसलेले असतात...
मुख्यमंत्री तोंडाला हात लावू नका हे सांगतांनाही तोंडाला हात लावून बसतात,
राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी स्वतःचे आधिकार न वापरता केवळ राज्यसभा खासदार असलेल्या माणसाशी बोलण्याचं आश्वासन देतात...
...
देवेंद्रजींनी आपला प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदार कामाला लावला असता,
योग्य आधिकार दिले असते,
आणि त्यांचं नेतृत्व स्वतः केलं असतं !
..
आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने देवेंद्रजींची गरज आहे !
सक्षम मुख्यमंत्र्याची, निर्णयक्षम प्रमुखाची, खंबीर नेतृत्वाची !
..
टिप : उद्धवजींनी सुद्धा "एकहाती" नेतृत्व, "खंबीर", ठाम निर्णय आणि प्रशासकीय ताळमेळ या तीन गोष्टी केल्या तर कोरोना गेल्यावर त्यांच्या कौतूकाचा पहिला ब्लॉग (पक्षीय भेद बाजूला ठेवून) माझा असेल.
..
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved