Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे...
त्यात रविवार !
पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा -
घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या,
चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका...
घाबरून घाबरून रहा...!
सतर्क रहा !...
...
त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...!
...
एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...!
...
अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ?
घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा...
उदा. जाळं काढा, भांडी घासा...
थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं,
दाखवून दाखवून करायचं...!
खुप केलं असं वाटायला हवं ...!
दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे...
कीव येईपर्यंत...!
या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल !
..
(काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! ....
आणि...
.
.
थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...)
...
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved