Posts

Gurupornima 2015

तीन-चार वर्षाँपूर्वी कुठल्याश्या कारणानं भांडणात रागाच्या सर्वोच्च स्ट्रोकला शेजारच्या काकूंना काहीतरी भलतं बोलून बसलो... आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांसमोर मम्मानं मला एक सणसणीत कानाखाली ओढली... त्यानंतर पुन्हा कितीही राग आला तरी कंट्रोल करायला शिकलोय...!! . काही कारणानं एका कस्टमरचा प्रॉडक्ट देण्यासाठी उशीर होत होता... ते इतकं फायद्याचं नाही म्हणून मी चालढकल आणि टाळाटाळ करत होतो... साधारण महिन्यानं त्याचं काम झाल्याचं कळालं... माझ्या आजोबांनी माझ्या नकळत स्वत: लक्ष घालून ते काम  पूर्ण करुन दिलं... मला माझी लाज वाटली. आणि आजोबांना सॉरी म्हणून, त्यानंतर कुठलंही काम वेळेतच पूर्ण करण्याची स्वत:ला सवय लावली...!! . अंधाराची मला खूप भिती वाटायची... लाईट बंद झाले तरी त त फ फ व्हायचं... एक दिवस पप्पांनी माझी एक महत्वाची वस्तू लपवली... इतर सगळे Options Lock केले... आणि ती वस्तू घेण्यासाठी करो या मरो प्रमाणे अंधाऱ्‍या खोलीत पाठवलं... त्या दिवशी पहिल्यांदाच घाबरत घाबरतच अंधारात उडी घेतली... And yes ! मी करु शकलो... भिती गायब !! पप्पांमूळे आत्मविश्वास आला... नंतर कधीच कुठलीच भिती राहिली नाही...!! .

Kalaam and I

Image
मी आणि कलाम मी सहावीत असतांना कलामांची तोँडओळख झालेली. वृत्तपत्रांतून, टिव्हीवर ते राष्ट्रपती झाल्याच्या बातम्या वाचलेल्या... तेव्हा कुणीतरी विलक्षण हूषार माणूस राष्ट्रपती झाल्याचं फक्त कळत होतं. नंतर हळू हळू त्यांचं कार्य, विद्यार्थ्याँविषयीची भावना आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टी समजत गेल्या. राष्ट्रपती म्हणून ते खूप चांगलं कार्य करतायेत असं ऐकू येत होतं. मध्ये मध्ये व्हिजन २०२० कानावरुन जात होतं. . त्याचदरम्यान "अग्निपंख" ऐकण्यात आलं... विज्ञानाची आवड, वैज्ञानिकांबद्दल कुतूहल  आणि कुणी विचारलं तर सांगता यायला हवं यासाठी ते पुस्तक मिळवून वाचून काढलं... कलामांचं गारुड झालं... Kalaam and kids, And dream comes in true, Kalaam and Me वाचण्यात आलं... आणि डॉ. कलाम या माणसानं मला अक्षरश: वेड लावलं... ISRO, रामेश्वरम, मिसाईल्स, पोखरण, न्यूक्लीअर पॉवर आणि २०२० या गोष्टीँची पारायणं सुरु झाली... या विलक्षण माणसाला आयुष्यात एकदातरी भेटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली. . ते राष्ट्रपतीपद सोडतांनाचा दोन बॅग्जबरोबरचा फोटो पाहून कलाम हे माझ्यासाठी आयडॉल पासून देवतूल्य झाले... . कलामांचं शक्य त

Kalaam and I

Image
मी आणि कलाम मी सहावीत असतांना कलामांची तोँडओळख झालेली. वृत्तपत्रांतून, टिव्हीवर ते राष्ट्रपती झाल्याच्या बातम्या वाचलेल्या... तेव्हा कुणीतरी विलक्षण हूषार माणूस राष्ट्रपती झाल्याचं फक्त कळत होतं. नंतर हळू हळू त्यांचं कार्य, विद्यार्थ्याँविषयीची भावना आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टी समजत गेल्या. राष्ट्रपती म्हणून ते खूप चांगलं कार्य करतायेत असं ऐकू येत होतं. मध्ये मध्ये व्हिजन २०२० कानावरुन जात होतं. . त्याचदरम्यान "अग्निपंख" ऐकण्यात आलं... विज्ञानाची आवड, वैज्ञानिकांबद्दल कुतूहल आणि कुणी विचारलं तर सांगता यायला हवं यासाठी ते पुस्तक मिळवून वाचून काढलं... कलामांचं गारुड झालं... Kalaam and kids, And dream comes in true, Kalaam and Me वाचण्यात आलं... आणि डॉ. कलाम या माणसानं मला अक्षरश: वेड लावलं... ISRO, रामेश्वरम, मिसाईल्स, पोखरण, न्यूक्लीअर पॉवर आणि २०२० या गोष्टीँची पारायणं सुरु झाली... या विलक्षण माणसाला आयुष्यात एकदातरी भेटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली. . ते राष्ट्रपतीपद सोडतांनाचा दोन बॅग्जबरोबरचा फोटो पाहून कलाम हे माझ्यासाठी आयडॉल पासून देवतूल्य झाले... . कलामांचं शक

Drinkers

Image
आज घडलेला किस्सा... . ऑफीसमधले एक काका, इतरांची भांडणं सोडवणं आद्यकर्तव्य मानतात. त्यांना आज विनाकारण बेवड्यांचा मार बसला... . रस्त्यावर दोन बेवड्यांची कुठल्याश्या राजकीय मुद्यावरुन हाणामारी सुरु होती. दोघंही फूल्ल्ल !! त्यामुळे बाकीचे मज्जा बघतांय. काकांना भांडण सोडवण्याची हुक्की आली... काकांना नको... नको... करत असतांनाच, भाषण सुरु झालेलं. "हा सभ्य लोकांचा रस्ता, इथे दारु घेऊन धिँगाणा करायचा नाही, हे काय तुमचं घर आहे का, निघा इथून वगैरे..." बेवड्यांनी आधी दुर्लक्ष केलं... पण , . एव्हाना मुद्दे पटून दोन्ही बेवड्यांचं एकमत झालं... गळ्यात गळे घातले गेले ! पण काकांची गाडी सुसाट... उत्साहाच्या भरात एका बेवड्याची गचांडी पकडून बसले... आणि ते सहन न झाल्यानं दुसऱ्‍यानं चारचौघात काकांना थोबाडीत लगावली आणि एक सणसणीत टप्पू ओढला... बस्स्स ! खेळ खल्लास...!! एकमेकांचे जीव घ्या भxxनो... गाल चोळत काका गाडीला किक मारुन रस्त्याला...!! पब्लीकला फुकटात डबल शो मिळाला. . मोरल ऑफ द इंसिडन्स... चुकूनही बेवड्यांच्या नादी लागू नये... मार पडू शकतो... Bewde... Bewde astat...!!  :-D   :-D

Roja

(मी हिँदू आहे. आणि पुर्णपणे हिँदूत्वाचा पुरस्कर्ता आहे. खालील स्टेटसचा विपर्यास करुन भलता अर्थ लावू नये आणि विषय भरकटवण्याची समाजसेवा करु नये.) . मुस्लिमांचे रोजे या प्रकाराबद्दल मला खूप वर्षाँपासून उत्सुकता आहे. आणि कौतूक सुद्धा. त्यांच्यातले काही लोकं एरव्ही वर्षभर कितीही वाईट वागत असले तरी रमजानचा पूर्ण महीना त्यांच्यातला संयम वाखाणण्याजोगा असतो. पूर्ण दिवसभर पाण्याचा थेँबही न घेता किँवा काहीच न खाता राहणं वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नाही... एक महीना ते पुर्णपणे त्यांच्या दे वाला समर्पित असतात. कुठलेच पापं करत नाही, रमजानच्या काळात कुठलेच शारिरीक संबंध प्रस्थापित करत नाहीत, सेहेर आणि इफ्तारच्या वेळा पाळणं... पाच वेळा नमाज पठण करणं हे किमान महीनाभर काटेकोरपणे पाळतात. आणि म्हणूनच त्यांच्यातली धार्मिक कट्टरता टिकून आहे. . तेच आपल्यातले बरेच लोक चार्तुमासात, श्रावणात कांदे-लसूण-मांसाहार वर्ज्य असूनही कंट्रोल राहत नाही म्हणून त्याला थोतांड वगैरे म्हणत खातातच. एकादशी, चतुर्थी, नवरात्रात तर उपवास म्हणून साबुदाण्याचे पदार्थ, राताळे, बटाटे वगैरे पोट दुखेपर्यँत दुपटीनं हाणतात... फक्त दत्तजयं

Childhood

सोसायटीत काही लहान मुलं क्रिकेट खेळत होती... खेळता खेळता छोटाश्या कारणाने भांडण झालं... एकमेकांच्या गचांड्या पकडून पार पटकून पटकून आपटणं सुरु होतं... दे दणादण... . इतक्यात बर्वे काका आले... बर्वे काकांचा सोसायटीच्या लहान पोट्याहोत कड्डक दरारा... त्यांना पाहीलं की पोरं जागा मिळेल तशी धूम ठोकतात... काका नजरेस पडताच बाकीची टिम गुल... आणि स्वत:च्याच तंद्रीत प्रदीर्घ भांडत असलेल्या दोघांपैकी एकाचं लक्ष तिकडे गेल्यावर "हिटलर काका आले... पळ" म्हणत एका क्षणात धूम ठोकली... आणि दुसऱ्‍यानं आऊटहाऊसमागे लपण्यासाठी एकमेकांना कव्हर केलं... काही क्षणांपूर्वी यांच्यात महायुद्ध रंगलं होतं, अशी शंकाही येणार नाही...!!  . लयीच भारी... अश्या भन्नाट लहान लहान घटना मोराच्या जादुई पिसासारखं बरंच काही करुन जातात... :-):-):-)

Parshuram Jayanthi 2015

लहान असतांना जेव्हापासून समज आली तेव्हापासूनच "आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळी कामं करायची असतात" असा एक समज मनावर बिँबवलेला...! शिव्या देऊ नये, इतर मुलं बोलतात त्यापेक्षा आमची भाषेची चाल वेगळी का ? या पासून ते रोज संध्याकाळी नित्यनियमे शुभंकरोती, गणपतीअथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आई किँवा आज्जी म्हणायला सांगते, ते माझं तोँडपाठ आहे पण इतर मित्रांना ते कां माहीत नाही असे बाळबोध प्रश्न पडायचे... आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर तर ते ब्राह्मणत्व ऑफीशिअली अंगात भिनलं.. . अंगावर जानवं घातल्यानं, ते कानात अडकवतांना किँवा जेवतांना चित्रावती घालतात हे फक्त आपणंच करतो या इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी कळल्या... न आणि ण चा फरक, खाद्यसंस्कृती, समाजस्थान, सौम्यपणा, शिस्त कलासंस्कृती यापासून विवाह-मृत्यूविधी पर्यँतचा ब्राह्मण आणि इतरांमधला फरक कळायला लागला. वयापरत्वे ते ब्राह्मणत्व बोलण्यात, वागण्यात, जगण्यात पुरेपूर भिनलं... मी ब्राह्मण या सर्वश्रेष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कृत, विद्वान धर्मात जन्माला आलोय. मला ब्राह्मण असल्याचा गर्व नाही "अभिमान" आहे. जय परशूरा

Unfortunate Fact

माझ्या ओळखीतल्या एका माणसानं त्याच्या वृद्ध आईला छळ छळ छळला... जेवायला देत नव्हता, मारहाण करायचा, राहण्यासाठी घराशेजारीच उघड्यावरच पलंग टाकलेला. बाकी औषधाच्या आणि कपड्यांच्या नावे बोँबच ! एकूण खुप हालच केले... (बऱ्‍याचदा त्या आजी इतरांच्या उष्ट्या ताटातलं खातांना मी स्वत: पाहीलंय... आणि तेव्हा यथाशक्ती मदतही केलीय.) पाच-सहा महीन्यांपूर्वी त्या आज्जी देवाघरी गेल्या. आज इतक्यातच तो माणूस खंगलेला, आजारानं वैतागलेला आणि शरीरानं अर्धा झालेला दिसला. लंगडत चालत होता. मी मुद्दामच गाड ी थांबवून चौकशी केली... मधुमेह, किडनीचे प्रॉब्लेम्स, सांध्याचे विकार अश्या अनेक आजारांनी त्याला धरलं आहे. दर दोन दिवसांनी डायलेसिसिस करावं लागतंय... आणि ना धड जगतंय ना मरतंय अश्या पंथाला लागलाय... त्याला तोँडावर ohhhh... hmm... असा रिप्लाय केला, पण माझ्या मनातल्या मनात "तू त्याच लायकीचा आहेस xxxच्या... स्वत:च्या कर्माची फळं भोगतोय..." असा आसुरी विचार त्या आजीँच्या दुर्देवी चेहऱ्‍यासोबत आला...! मी चूक की बरोबर कळत नाहीय...!!

Real life in Real

मला नेहमीच एक प्रश्न पडतो... म्हणजे पहा ना, मराठी-हिँदी चित्रपट, मालिका एका स्क्रिप्टनंतर संपतात... पण त्यातली पात्र चित्रपट-मालिकेच्या पल्याड खरंच्च आहेत असं मानलं तर चित्रपट-मालिका संपल्यावर त्यांचं पुढे काय होत असेल ? म्हणजे शोले मधला ठाकूर, विरु-बसंतीला रेल्वेत बसवून घरी गेल्यावर राधाशी काय बोलला असेल ? विरु-बसंतीचं पुढचं आयुष्य कसं असेल ? ते रामगढला येऊन ठाकूरला भेटत असतील का ? हम आपके है कौनमध्ये मोहनिश बहल पुढे आयुष्यभर तसाच विधूर असेल की दुसरं लग्न केलं असेल ? अशी ही बनवाबनवीमध्ये घरमालक आज्जी मेल्यानंतर ते घर अशोक सराफ अॅन्ड कंपनीकडेच असेल कां? कि विजू खोटेँनी घेतलं असेल ? अ.स अॅन्ड कंपनी पुढे सेट झाली असेल की नाय ?  चार दिवस सासूचे मधली म्हातारी मेली की अजून तश्शीच धडधाकड आहे ? एका लग्नाची दुसरी गोष्टच्या राधा-घनाला मुलबाळ झालं असेल ना ? श्रीमंत दामोदरपंतच्या दामूचं लग्न झालं की नाही ? लगानच्या भूवननं पुढे क्रिकेटची प्रॅक्टीस चालू ठेवली असेल की बंद केली असेल ? गावानं भूवनचा सत्कार केला असेल का ? कुछ कुछ होता है मधला अमन शाहरुख-काजोलच्या घरी य

Hindu vs

कट्टर हिँदूत्व ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ? इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ? जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ? वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ? घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ? इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ? टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ? हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ? जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ? प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ? रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे... आणि तरंच दुपारच्या फोटोवरुन मला अक्कल शिकवायचा...!! जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो - वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved