Posts

मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ...  "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने

#भाकरीबाई

Image
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...! ... २०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं - बाई आल्या... "मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या... समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...! करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा... बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची... एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं... झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं... ... सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची, त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची, आणि एका घरात ठिणगी

CabDriver and Me

घर ते ऑफीस शेअर कॅब बुक केली, पेमेंट मोड कॅश ठेवला. (जनरली डिजीटलच करतो, आज तो फोन डिस्चार्ज होता...) ज्याचे झाले १४४ रुपये... कॅब ड्रायव्हरनं आधी पैसे मागितले - मी १५० दिले... त्याने ६ रुपये ड्रॉपला परत देतो सांगितलं... ... अख्खा प्रवास त्या माणसाने पक पक पकवलं, सीएए - कॅबने देशाची कशी वाट लावलीय ते बकला, हम लोग क्या इन्सान नही ? हमने मोदी का क्या बिगाडा ? भला हो राहूलजीका जो अकेले नड रहे... - ऐ भाय दिमाग मत खा सवेरे सवेरे... बोलून त्याला गप्प बसवलं, हे असे यझ खूप भेटतात दिवसभरात - त्यांची यथाशक्ती घेतलीही जाते, त्यामूळे काही वाटत नाही, पण सकाळी सकाळी नको कटकट... ... इतक्यात आरे फ्लायओव्हरला एक टिपीकल मराठी काका बसले, त्यांची आणि माझी हाय-हॅलो ओळख आहे... त्यामूळे भेटल्यावर पुन्हा हाय हॅलो झालं... त्यांचं दुकानाच्या जीएसटीचं काही लफडं सुरु होतं... त्याचा सल्ला घेण्यासाठी मित्राकडे निघाले होते... पुन्हा तिच कॅसेट दुसऱ्या आवाजात वाजली... जुनंच चांगलं होतं, कॅश यायची, व्हॅटची इतकी कटकट नव्हती ... आता जो येतो तो कार्ड दाखवतो... सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं... ! हे ओळखीचे असल्या

Valentines Day 2020

Image
आमची व्हॅलेंटाईन स्टोरी - .. आमचं असं प्रपोज वगैरे झालंच नाही - एकमेकांच्या प्रेमात आहोत हे दोघांनाही पक्कं उमगलेलं होतं, ते फॉर्मली बोलायची वेळ आली नाही... डिस्कशन डिरेक्ट लग्नाची बोलणी कधी सुरु करायची यावर झालं - ... दोघांनीही घरी सांगितलं - भेट ठरली - आम्ही सगळे सेलूला गेलो - नंतर तिचे आई-पप्पा आमच्याकडे आले - लग्न ठरलं - झालं !  ... कुणाचा विरोध नाही - ना फॅमिली ड्रामा... ट्विस्ट म्हणाल तर टप्प्याटप्प्यावर थोडक्यात थोडके येत गेले, पण त्यात फार थ्रिल नव्हतं - ... लग्न झालं - संसार सुरु झाला... ती माझ्यापेक्षा वयाने २ दिवस मोठी असल्याने चिडली - रागवली तरी फार वाईट वाटत नाही... दिड वर्षात पक्का मुरलो - !  ... लग्नापासून व्हॅलेंटाईन डे रोजच साजरा होतो - डिमार्टला जावून groceries आणण्यासारखी तद्दन संसारी कामं करतांना !  आता तर एक लेकरुही हातात आलंय - तो दिवसागणिक वाढतोय -  तसं आमचं प्रेमही परिपक्व होतंय, आणि रोजचा व्हॅलेंटाईन डे सुद्धा बहरतोय - एकमेकांना समजून घेतांना.

India Stands With NRC

Image
मी, तेजस विनोद कुळकर्णी, गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की - NRC कायदा लागू झाल्यानंतर माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारत सरकारने "जर" काही कागदपत्र मागितले तर मी आनंदाने देईल... ! रांगेत उभं रहावं लागलं तरीही चालेल. .. आणि घरी आल्यानंतर सेल्फी सुद्धा टाकेल...! .. माझ्याकडे पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबूक, कंपनीचं डिन सर्टीफिकेट, बर्थ सर्टिफीकेट, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, वोटर आयडी कार्ड, ड्राइविंग लायसन्स, मॅरेज सर्टिफीकेट, सहा वर्षांपासूनचे आयटीआर रिटर्नस् कॉपीज् - १ ली ते मास्टर्स पर्यंतचे एकूण एक मार्कशीट्स, डिग्री, एलसी, टिसी वगैरे सगळं आहे... :-D :-D ... त्यात अजून एखाद्या कार्डची, कागदाची भर पडेल ! .. #indiastandwithnrc होवू द्या ट्रेंड !

व्यवसायिक प्रयोग

= व्यवसायिक प्रयोग = . २०१९ हे वर्ष टि.के. गृपला उत्तम व्यवसायिक अनुभव देणारं ठरलं... आमचे काही प्रयोग प्रचंड यशस्वी ठरले. आणि ज्यातून गेल्या कॅलेंडर वर्षीच्या तुलनेत कंपनीची वाढ आणि फायदा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतोय... ते प्रयोग कंपनीच्या पहिल्या पाच वर्षात धाडस ठरावं असं होतं. कंसेप्ट माझ्या बायकोनी दिली... आधी धाकधूक होती - पण आता जेव्हा आम्ही Analysis केलं तेव्हा त्यातलं यश स्पष्ट दिसतंय. .. प्रयोग १ : MoU - TieUp आमचे प्रमुख ४ डोमेन्स आहेत. Technology (Software), Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... आम्ही या वर्षी Individual Expansion सह MoU and TieUp किंवा Joint Expansion चा प्रयोग केला. म्हणजे कसं ? - तर, ज्या कंपनी किंवा स्टार्टअप गृप्स समव्यवसायात आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आणि त्यांच्याशी MoU करुन जॉइंट प्रोजेक्टस् सुरू केले. जे स्टार्टअप होते त्यांना आमचा फायदा झाला, त्यांच्या Innovation and Skill Set चा आम्हाला फायदा झाला...! मुंबईत ३, पुण्यात ४ आणि नाशिकमध्ये १ असं Association झालं...! आम्ही Individual Asset म्हणून आहो

Dr. Shriram Lagoo

Image
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानं मराठी अभिनयसृष्टीच्या नटसम्राटाची अखेर झाली. वरच्या फळीतले कदाचित  लागू एकमेव शेवटचे उरले होते, ते ही आज गेले. .. डॉ. श्रीराम लागू पर्व संपलं. आणि त्यांच्यासोबत कदाचित एक पिढीही संपली...! ... मन संकल्पना, भूतभविष्य, देव-दानव, श्रद्धा-अंधश्रद्धा यांना त्यांच्या जडवादाने नेहमीच विरोध केला. मृत्यूनंतर काहीही राहत नाही या त्यांच्याच सिद्धांताने त्यांना "श्रद्धांजली" म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांचं राजकीय-वैचारीक मत गोंधळलेलं होत, पण अभिनयातील त्यांच्या भव्य कारकिर्दीसाठी आदर...!

नगासी महानग

= व्यवसायातले नग = ... साधारण दहा महिन्यांपूर्वी फेबुवारीत एक महोदया अंधेरी ऑफीसला जॉईन झाली...! जावा प्रोफाईल, दोन वर्षांचा आधीचा अनुभव होता... टू पॉइंट फोरचं पॅकेज दिलं...! जॉईन केलं, ट्रेनिंग झालं एक महिना - मार्च महिन्यात सुरु झालेल्या एका प्रोजेक्टवर तिला घेतलं...! ... कुणालाही प्रोजेक्टवर घेतलं की मी जनरली प्रोजेक्ट ड्यूरेशनपर्यंतचं लॉक-इन अॅग्रिमेंट करुन घेतो... म्हणजे तो प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यंत जॉब सोडता येणार नाही, आणि सोडायचाच असेल तर अॅग्रिमेंट ड्यूरेशनपर्यंतचं पुर्ण सीटीसी कंपनीत जमा केल्याशिवाय सोडू देत नाही... सिक्यूरिटीसाठी गरजेचं असतं ते ! अगदीच  Genuine कारणासाठी मात्र त्यात तडजोड होते. प्रोजेक्टवर असतांना सुट्टी हवी तरी किमान २ दिवस आधी लिडरला सांगून मॅनेज करायची पॉलीसी आहे...! त्यातही Genuine कारण असलं तर समजून-उमजून काम चालतं... (अडून बघत नाही.) ... तर, महोदयाने ऍग्रिमेंट साईन केलं, प्रोजेक्टवर जॉईन झाली, प्रोजेक्ट ड्यूरेशन होतं सात महिने. म्हणजे सप्टेंबर पर्यंत... ! काम सुरु झालं...! दोन महिने झाले... ! दरम्यान महोदयाने दोन महिन्यांची व्यवस्थित सॅलर

खोपा शिडीला टांगला...

खोपा शिडीला टांगला... 'टाटा मोटर्स'चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कँशिया, स्पँथोडिया, ग्लिरिसिडिया, जँकरेंडा, पेल्टाफोरम, बाँटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डाँ. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी. चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची 'इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी.'  'टेल्को' कंपनीने ती  ताब्यात घेऊन तिथे आपली ' मशीन टूल डिव्हिजन' सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला 'स्टँडर्स बिल्डिंग' नावाची, इंग्रजी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved