Rafi - The God
रफी साहेब... स्वर्गातले गंधर्व अवतार घेतात, कार्य करतात, देणं देतात... आणि स्वस्थानी परत जातात... त्यांना ना जन्म असतो ना मृत्यू... मानवी मर्यादा त्यांना आड येत नाही, ना ते कधी संपतात... मोहम्मद रफी नावाचा देव होऊन गेला... त्या देवाने आपल्या स्वर्गीय आवाजाने भरभरून दिलं, मागच्या चार आणि पुढच्या शेकडो पिढ्यांवर आजन्माचं ऋण देऊन १९८० मध्ये याच दिवशी स्वर्गात स्वस्थानी प्रस्थान केलं... रफी साहेबांच्या आवाजाने प्रत्येकावर जादू केलीय... प्रत्येकजण त्या आवाजाचा भक्त आहे... खुशनसीब है वो लब्ज़ जिनको तुमने छुआ, जन्नत मिले उस गाने को जिसे रफी ने गाया.. .. वयाच्या सातव्या वर्षी लाहौरमध्ये एका फकीराच्या मागे फिरुन ते त्याच्यासारखं गात असत, त्या फकीराने हा अवलिया जगाला दिला.. त्यांची गानप्रतिभा त्यांच्या भावाने ओळखली आणि उस्ताद वाहीद खान यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं... हे सुरु असतांना प्रख्यात गायक कुन्दनलाल सहगल यांचा कार्यक्रम लाहौर रेडीओकरता होत होता, लाईट गेले आणि गोंधळ झाला. त्यावेळी जमाव शांत करण्यासाठी रफींच्या मोठ्या भावाच्या विनंतीने त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या प्रेक्षकां...