Relations beyond the Business

कार्पोरेटस् मध्येही बऱ्याच गोष्टी या गुजरात्यांकडूनच शिकण्यासारख्या असतात... Beyond Business रिलेशन जपण्यात या लोकांना तोड नसते...
..
एका इलेक्ट्रॉनिक शॉपवर मित्राच्या Recommendation नी ऑफीसकरता मी स्क्रीन्स, साऊंड सिस्टीम, पी.सी, फ्रिज वगैरे घेतलं... ते इन्टॉल केलं... पेमेंटचा चेक देण्यासाठी गेलो... ! "तेजाभाय, नास्ता करके जावो मालिक" म्हणून चहा, आणि दाबून  फाफडा वगैरे झाल्यावर - त्यानं मिठाईचा बॉक्स हातात दिला...
"वेलकम टू अवर फॅमिली मि. कुलकर्णी... "

डिल झाली की beyond Business, काहीतरी स्विटस् देऊन सेलीब्रेट करतात...
पुढची डिल इथेच फायनल होते...
लेटस् सेलीब्रेट द बिजनेस... मस्तय हे..

मागे एकदा एका हाऊसिंग सोसा. प्रोजेक्टमध्ये गुजराती पार्टनरनं प्रत्येक ग्राहकाला खरेदीखता बरोबर लक्ष्मीची चांदीची मूर्ती, आणि मिठाईचा बॉक्स देण्याची आयडीया दिली होती, तो आमचा एकत्र पहिलाच बिग प्रोजेक्ट.
दोन हजाराची मूर्ती + पाचशे रुपयाची काजूकतली : अडीच हजारात पुढच्या प्रोजेक्टची बोहनी त्यातूनच फिक्स झाली... !

क्वालीटी मॅटर्स, पण beyond the official, formalities प्रत्येक माणसाच्या मनाचा एक informal कोपरा असतो,
तो जपला की व्यावसायिक मैत्र वाढतं...
व्यवसाय वाढतो... !

डिल भलेही लहान असो, मिठाईचा एक बॉक्स जादूगाराचं  काम करतो... छोटी छोटी गोष्ट मोठी मोठी फायद्याची असते... ! अश्या लहान लहान प्रसंगातूनच माझ्यातला मी घडतोय..! मुंबईतून एमबीए आऊट स्टँडींग ग्रेड करून मध्ये आली नाही ती अक्कल Actual बिजनेस सांभाळतांना येतेय... बहोत सिखना है बेटा... बहोत कुछ !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved