श्रावण
काही दिवस हे ठरवून एकाच मापातले असतात, त्या त्या दिवशी प्रत्येक गोष्ट अनुक्रमे घडतेच. श्रावणाचा पहिला दिवस यूगानूयूगे सेsssम... जसा लहानपणी होता, त्याच थंडगार झुळूका आजपण वाहतात... काहीतरी स्पेशल घडतंय टाईप.
..
श्रावण म्हणजे काय ? लहानपणासूनची बेसिक कन्सेप्ट - या महिन्यात रविवार आणि सोमवार दोन्ही दिवस सुट्टी असते,
देवघरात तो नागाचा कागद चिटकवतात..
सोमवारफेवरेट महादेवाचा दिवस..
बुधवारी तिजोरीवर कुंकूने ते ह्यूमन बॉडी शेपचं पेअर बनवतात.
शुक्रवारी फुटाणे...
श्रावणात भरपूर सुट्ट्या असतात.
श्रावणात दहीहंडी येते.
श्रावणात गणपतीची चाहूल लागते...
मोठं झाल्यावर पद्धत बदलली, पण श्रावण आणि कन्सेप्ट सेम आहे...
...
लहानपण आठवून देणारा श्रावण.
...
श्रावणाचे गाणे पण जबरदस्त...
सावन को आने दो... श्रावणात घननीळ बरसला... श्रावणधारा... श्रावण आला या वनी... ऋतू हिरवा... शुक्रतारामधील काही गाणी...
ही गाणी इतर वेळी ऐका, आणि श्रावणात ऐका... श्रावणात ऐकली तर बरोब्बर मनाच्या त्या कोपऱ्यापर्यंत जातात, जिथे गेल्यावर फिल होतं, खऱ्या अर्थानं आनंद, समाधान लाभतं...
अजून एक-दोन गाणी आहेत. जर कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करताय, तर गाडीच्या प्लेलीस्टमध्ये "वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद", जाई जुईचा गंध मातीला... ही गाणी राहू द्या... निसर्ग इन श्रावण काय असतं ते याची देही याची डोळा अनूभवाल.
...
हिंदीतलं एक एव्हरग्रीन गाणं - आने से उस के आऐ बहार... रफी साहेबांचं गाणंय... जीने की राह मधलं...! ऑलटाईम हिट आहे, पण श्रावणात एखाद्या छानश्या क्षणी ऐकलं तर स्वर्ग आणि स्वर्गच...
यातला अंतरा - बन सवर के निकले आऎ सावन कां जब जब महिना... कसला जीव ओतलाय त्यांनी. श्रावणात स्त्रियांना नवी झळाळी मिळते त्याचं अवघ्या चार ओळीत अफाट वर्णन केलंय... रफी साहेब आणि श्रावण याचं एक मस्त कॉम्बीनेशन आहे, ठरवून नाही - पण आपोआप झालेलं... आने से उसके च्या पठडीतलीच काही गाणी अजून आहेत, बहारो फूल बरसाओ आणि आज मौसम बडा बेईमान है बडा.... लतादिदींसोबतचं रिमझिम के गीत सावन गाऐ... फक्त श्रावणातच ऋदयात भिडतात अशी गाणी...
..
आज मौसम बडा बेईमान है हे मराठीत बालकवींनी सांगितलंय....
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे....
बालकवींनीच श्रावणाचं मन परफेक्ट ओळखलंय ते आनंदी आनंद गडे मध्ये,
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभातं भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे,कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या पेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले,चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
...
उत्तरायण मधलं धुंद होते शब्द सारे" सुद्धा श्रावण फिलींग गाणं आहे.
.
श्रावण येतांना उत्साह, प्रेम, चैतन्य, नाविन्य घेऊन येतो...!
सगळं छान होतंय, छान वाटतंय अशी गोड फिलींग देणारा महिना आहे. खूप सकारात्मकता भरलीय आजपासून, शुभस्पंदनं - पॉजिटीव वेव जाणवताय...
श्रावण - रोमॅन्टीक, गोड, हलकासा, थंडगार आणि छानसा !
हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला...
:-)
- तेजस कुळकर्णी