Pranab Mukherjee As President

हुषार, विचारी आणि अभ्यासू व्यक्ती उपजत तैलबुद्धी लाभलेले प्रणब मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत आहेत... अनेक देशद्रोही गुन्हेगारांना फाशी देण्यापासून अनेक महत्वाचे घटनात्मक निर्णय, राज्यनिर्मिती सह, महत्वाचे कायदे करण्याचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले गेले... राज्यांमध्ये उद्भवणारे पेचप्रसंग त्यांनी उत्तमरीत्या सोडवले...

मोदींच्या निर्णयात अदृष्य शक्ती म्हणून प्रणबदा भक्कमपणे उभे होते... भारताचं परराष्ट्र धोरण ज्या मजबूतीत उभं आहे त्याचं अर्ध श्रेय निश्चीतच प्रणबदांना जातं... तेरापैकी ज्यांची कारकीर्द गौरवास्पद म्हणून ओळखली जाईल अश्या फार थोड्या राष्ट्रपतींमध्ये प्रणवदांचं नाव डॉ. एपीजे कलाम, डॉ. राधाकृष्णन यांच्या बरोबरीने घेतलं जाईल... !

त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळाचा समृद्ध लेखाजोखा :
(१) दोन टोकाच्या भिन्न विचारांच्या सरकारांबरोबर कारकीर्द झाली. आधीची दोन वर्ष घोटाळ्यांत बुडालेलं मनमोहन सरकार, पुढची तीन वर्ष मोदी सरकार. त्यात त्यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली.
(२) देशाच्या संरक्षणावर विशेष भर दिला. अंतर्गत वादावर पुरेसं नियंत्रण मिळालं तर बाह्य शत्रूशी लढता येईल हे वेळोवेळी पटवून दिलं.
(३) अनेक कायद्यांवर, घटनात्मक बदलांवर लक्ष दिलं. त्यांची अंमलबजावणी केली.
(४) संसदेत विरोधी पक्षाच्या लोकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळांवर प्रणबदांनी अधिवेशनाच्या अभिभाषणातच खडे बोल सुनावले होते. संसदेचं कामकाज व्यवस्थित होण्यासाठी कठोर भूमिका घेतली.
(५) ३५ दयायाचिका mercy petitions फेटाळल्या. अनेक गुन्हेगारांना फासावर लटकवून कायद्याची पकड मजबूत असल्याचं सिद्ध केलं.

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त होतांनाही कलामांप्रमाणे ते केवळ पुस्तकं घेवून जाणारेत...

कॉंग्रेस सारख्या पक्षात आयुष्य घालवावं लागलेल्या या सोन्यासारख्या माणसाच्या आयुष्याला उत्तरार्धात कां होईना पण योग्य प्रतिष्ठा प्राप्त झाली हेच भाग्य... !
देशाचा नागरीक म्हणून त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना .... अश्या करोडो अंतःकरणपूर्वक शुद्ध प्रार्थनांचं बळ त्या माणसाला प्राप्त होतं ! ... एका चांगल्या माणसाच्या हाती आपला देश होता... !
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved