बारावीचा निकाल and Me
२५ मे २०१० चा भयंकर दिवस जसा जाहीर झाला, डोळ्यासमोर दिवसा तारे चमकत होते... आधीच्या तीन रात्री झोपही नव्हती... २४ नंतर २५ला दुपारी १ पर्यंत धssडधssड...धssडधssड... थाऱ्यावरच नव्हतं... आपण लाख चांगलं लिहीलंय, पण भणकेल एक्झामिनरनं त्याच्या बायकोशी भांडून तो राग आपल्याच एखाद्या पेपरवर काढला असेल तर ? ... ते ... मला जर सूपरपॉवर असती तर मी त्या रिजल्टमध्ये घुसून तो ९९.९९ टक्के केला असता वगैरे मारामारी मनात सुरु होती ... त्या वर्षी आमच्या अख्ख्या घराण्यात हेच एकमेव शिंगरू बारावीला... त्यात लार्जर दॅन लाईफ इमेज... चुकून माकून एखाद्या विषयात गचकलो तर... ? सगळे नातेवाईक मिळून पूजा घालतील... छातीत धस्स्स... नको नको... calm down tejaaa.... be positive... रिजल्टसे डर नही लगता साब... नातेवाईकसे लगता है... टाईप गोंधळ सुरू होता...
...
कारणही होतं...
क्लास लावला नाही म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत इंटरनलनं फाईल्स साईन करायला नाटकं केली... प्रॅक्टीकल एक्झामला कुरापती काढून वाद घातला... रागात मी अटेंडन्स साईन करुन निघून गेलो... आणि सगळ्यांसमोर धुंदीत - प्रॅक्टीकलचे मार्क नाही तर नाही, नो नीड... मी थेअरी एक्झाममध्ये कव्हर करेल... वगैरे भीष्मप्रतिज्ञा घेवून बसलो...
बॅचला सगळ्या मुली - त्या पण ओळखीच्या !
त्यामूळे आवेग ओसरल्यावर मस्तीत माती खाल्लीय हे वाजलं... पण नो ऑप्शन... नाकावर टिच्चून मी त्यात ७० क्रॉस मारेलच... वगैरे... घेतलंय तर करायचंय !
..
थेअरी एक्झाम आली... बाकी विषयांचं तसं टेंशन नव्हतं, मॅथ्स-फिजीक्स-कॉम्प. चं तर बिलकूलही नव्हतं... पण ज्या विषयात पंगा घेतला होता, त्याचं आणि माझं हाडवैर... त्यात पहिला पेपर हार्ड पडला... ४० पैकी जेमतेम २०-२२ चं गाडं ओढलं गेलं... हातभर फाटलेली... ! दुसऱ्या पेपरमध्ये एक दिवस गॅप होता... टेंशनमध्ये ताप काढला... तरीही करो या मरो समोर ठेवून दुसरा पेपर धुतला... सॉलीड... दुसरा ऑप्शनही नव्हता... घोकलेलं, रट्टावलेलं, इकडचं तिकडचं ढूंकून, काही स्वतःचं डेअरींग वापरुन ४० पैकी ३५-३८ पर्यंत ओढला... पण त्याची गॅरंटी नव्हती..
...
रिजल्टचा दिवस उजाडला...
पंख नसतांना उडणं, एसीत घाम फुटणं वेग्रे प्रकार होत होते... १ वाजला... थरथरत नंबर टाकला... डोळ्यांवर हात ठेवून पेज लोड व्हायची वाट बघत होतो... अख्खं ब्रह्मांड समोर दिसत होतं... पेज लोड झालं... आणि डोळ्यांच्या फटीतून खालची ओळ वाचली...
"Congratulations! You are passed "
हे दिसलं आणि मी खुर्चीवरच उभा... अत्यानंद... तो क्षण जबरदस्त होता...
मार्कपण भरमसाठ.. !
...
दुसऱ्या मिनिटाला फोन वाजला... Congratulations Tejaaa... You have done it ! त्या वादाचा प्रत्यक्ष्य साक्षीदार असलेला एक मित्र बोलत होती...
त्या मार्कांपेक्षा - एका माजोरड्या माणसाच्या नाकावर टिच्चून ते मिळवले याचा जास्त आनंद होता... ! दरवर्षी बारावीच्या रिजल्टला हा अख्खा सिन डोळ्यासमोर उभा राहतो... मी आरश्यात बघत स्वतःचे गाल ओढून स्वतःलाच फ्लाइंग कीस देतो...
.
बाकी बारावी तिथेच संपते... यश-अपयश पण... त्यानंतर जे कराल तेच खरं... ! अपयश आलं तरी लगेच परीक्षा होतात, जुलै मध्ये...! हे लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा... नापास झाले म्हणून आजच्या आज आत्महत्या वगैरे करायला हवी असं नाही... नातेवाईक, लोकं यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं...
हम सिर्फ हमसफर,
गैर कुछ पेड तो कुछ पत्थर... !
आज बारावीचा मैलाचा दगड पार करणाऱ्या, म्हणजे जे पास होतील ते...
दोन दिवस सगळं बाजूला ठेवून विचार करा,
आपल्याला काय झेपेल,
डोकं कुठे चालेल
मार्क किती...
आयुष्यात काय करायचंय ...
हे सगळं बघूनच - विचार करूनच अॅडमिशन घ्या... !
बाकी तुम्ही हुषार आहातच ... !
..
जे आत्ता ९वी - ११वी मध्ये आहेत...
एक वर्ष सगळं बाजूला ठेवा...
जीव तोडा
पण १०वी - १२वी ला मार्क मिळवा... !
मार्कच बोंबलतात... बाकी तुम्ही किती चांगले किती वाईट हे दुय्यम आहे !