Ashadhi Ekadashi
आजचा दिवस विठ्ठलाचा ?
बिलकूल नाही...
हा दिवस वारकऱ्यांचा, त्यांच्या प्रामाणिक निष्ठेचा... गाढ विश्वासाचा... अगम्य इच्छाशक्तीचा... !
आजचा देव पंढरपूरातल्या त्या गाभाऱ्यात भेटणारच नाही...
तो चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारतांना भेटेल
पंढरीतल्या रस्त्यांवर बेभान नाचतांना भेटेल
कुठे दर्शन रांगेत उभा दिसेल
त्या वारकऱ्यांच्या सोयीकरता अन्न-पाणी वाटतांना दिसेल...
तोच देव उद्यापासून पंढरपूरचे रस्ते, मैदानं स्वच्छ करतांनाही दिसेल...
त्या पोलीसांमध्येही तो आहे...
विठ्ठल आज पंढरपूरच्या चराचरात आहे..
विठ्ठल आज वारकऱ्यांत आहे... तिथेच रमलाय ...!
- तेजस कुळकर्णी