जे होतं ते चांगल्यासाठीच होतं
तीन वर्षांपूर्वी, मास्टर्सला असतांना फायनल टर्म आधी एका मोठ्या कंपनीकरता (नॉन एमएनसी) माझं आणि सोबत चार मित्रांचं सिलेक्शन झालं... कम्यूनिकेशन चांगलं - टेक्नीकल स्कील एक्स्पर्ट लेव्हलचे त्यामूळे पाच आकडी तगडं पॅकेज, पुढेमागे भूsssर उडायचा चान्स, हाय लेव्हल प्लॅटफॉर्मचे प्रोजेक्ट, फाईव्ह स्टार सराउडींग आणि बेसिक वन इयर कम्पलसरी कॉन्ट्रॅक्ट असा मामला सेट होता... फुल्ल हवेत उडत होतो...
..
फायनल एक्झाम्स नंतर सुरू होणाऱ्या एका प्रोजेक्टकरता आम्ही प्लेस होणार होतो. मध्ये जवळपास दोन महिन्याचा काळ हातात होता... कॉन्फीडन्स लेव्हल स्वर्गात होती... त्या फेज मधलं टॉप सॅटीस्फॅक्शन लेव्हल होतं... सुखी वेलसेट आयुष्याचं प्लानिंग सुरु झालेलं... एक एक दिवस गेला - जॉइनिंग डेट जवळ येता येता तीन दिवसांवर आली... आतुरता काय असते ते तेव्हा कळत होतं. सोमवार, १ तारखेला सकाळी ९ः३० ला रिपोर्टिंग करण्याचा रिमाइंडर मेल आला... २९... ३०... ३१... Three days left only.... असं Countdown सुरु झालेलं... आणि २९-३० च्या मधल्या रात्री माझं चक्र उलटं फिरलं...
..
त्या रात्री अचानक पोटात दुखायला लागलं, उजव्या बाजूला... ! मरणाच्या वेदना. पोट आणि पाठ प्रचंड ठणकायची. पुण्यात घरी एकटाच. रात्रभर झोप नाही. काहीतरी भलतं खाण्यात आलं असेल, सो होत असेल म्हणून सोडा, पेनकिलर ते बाम लावल्यापर्यंत उद्योग केले. रात्र काढली... ! ३० तारखेला सकाळी, अंगात थोडी कणकण जाणवत होती... पोटात दुखणं तसंच होतं. शनिवार होता... घराजवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन इंजेक्शन घेतलं, १ ची तारीख समोर होती. ड्रेस, डॉक्यूमेंट वगैरे तयारी करण्यात ते दुखणं दुर्लक्ष करुन, होईल ठीक म्हणत आणि खाणं कंट्रोल करून दिवस कसातरी पास केला. पण ३०-३१ च्या मधल्या रात्री पुन्हा तोच प्रकार... अचानक कां ? काहीच कळेना. अंगात ताप, पोट-पाठ दुखणं खूप जास्त वाढलं... रडत-पडत रात्र काढली, ३१ तारीख आली... उठून उभंही राहता येत नव्हतं. दुखणं आणि अंगात ताप होता. मी दुखणं मनावर घेत नाही, पण फक्त एक दिवस हातात आहे, उद्या कसंही फ्रेश होवून जॉईन करु हेच डोक्यात होतं...
..
उभं राहण्याचंही त्राण नव्हतं .... त्यात भर ३१ ला दुपारपासून यूरीनेशन पूर्णपणे बंद झालं... वेदना, ताप त्यात हे भलतंच उद्भवलं.. आता क्लीनीकमध्ये जाऊन मॅनेज करू म्हणून डॉक्टर असलेल्या काकांना फोन केला. ते आले, आणि घरीच पेनकिलर वगैरे दिलं. त्यातून तासभर ठिक वाटलं - पण तासाने पुन्हा जैसे थे -
तब्येत जॉबपेक्षा वरचढ झाली. मनातून ब्लॅक वेव आल्या,
धुळ्याला घरी कुणालाच सांगितलं नव्हतं...
आज जर घरी गेलो नाही तर इथे मरुन पडलो तरी कुणालाच समजणार नाही वगैरे विचारांनी गर्दी केली... एच आरला उद्या फोन करू, आधी त्रास संपू दे तेजा... ! एक पाण्याची बाटली आणि ब्लेंकेट घेतलं - स्लिपर ट्रॅवल्सला बूक केलं. आणि मित्रांच्या मदतीनं धुळ्याला निघालो.
..
त्या प्रवासात वेदनेनं तडफडत एक एक मिनीट मोजत रडत रडत मी धुळ्यापर्यंत आलो, माझ्या आयुष्यातल्या वाईट रात्रीपैकी ती एक रात्र होती. धुळ्यापर्यंत जात जात राहतो की नाही याची गॅरंटी नव्हती...
कसातरी घरी आलो, दुसऱ्या मिनीटाला हॉस्पिटलमध्ये रवानगी... एचआरनं नेक्स्ट सोमवार पर्यंतची वेळ दिली, आणि जॉईन नाही केलं तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल समजायची नोटीसपण.
यूरेट्रा, किडनी इथे स्टोन झालेले... यूरीन ब्लॉक्स. तिथून वन बाय वन सुरु झालं... स्टोन्स, टाईफाईड, हिटींग प्रॉब्लेम्स... तो आठवडा कुठे गेला कळलं नाही... पुढचे सहा महिने मी माझ्या शरीराशी झुंजत होतो...
मी ६ महिने धुळ्यातच होतो... आठवडा संपला - जॉब गेला - फायनल टर्मचे परीक्षा फॉर्म सबमिट करता आले नाही, इयर बॅक झालं...
बरोबरीचे मित्र फायनल एक्झाम आवरून त्याच कंपनीत सेट झाले....
..
हेल्थ, प्रोफेशन, एज्यूकेशन आणि त्यात आलेला ६ महीन्यांचा व्हॅक्यूम. ज्यानं माझं एक वर्ष ढवळलं होतं... त्या फेजनं माझं सगळं बिघडवलं, आर्थिक गणितं कोलमडून पडलं, शारीरीक नुकसान झालं... त्यात पून्हा आधीसारखं होणं म्हणजे खूप वेळ देणं होतं... परीणाम : फ्रस्टेशन ! चिडचिडा स्वभाव झाला.
दरम्यान हातातल्या इतर अनेक संधी निघून गेल्या... !
मी हवेत होतो, २९-३० च्या रात्री धाsडकन आपटलो... !
चांगल्या काळात कमालीचा धार्मिक मी, या वर्षभरात नास्तिक बनलो... ! स्वतःसाठी निरर्थक शून्य माणूस झालो... येतांना सगळं घेरून येतं, हे कमी की काय रिलेशनल प्रेशर्स सुरु झाले... फॅमिली प्रेशर्समूळे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं... अश्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये स्वतःला सांभाळू, तब्येत सांभाळू, आर्थिक प्रश्न मिटवू, शिक्षणातला गॅप भरून काढू, करीयरला आलेलं अॅबस्टॅकल क्रॉस करू की तुटणारं नातं सांभाळू ? ... बॅडपॅच म्हणा - साडेसाती म्हणा कींवा अजून काही... सगळ्या स्तरावर अपयश होतं... !
मी त्या एक वर्षात मी पूर्णपणे शून्यावर आलो. !
..
एक वर्षानंतर तब्येतीचे वाभाडे काढत कसं तरी मास्टर्स ट्रॅकवर आणलं, अभ्यासाचं तसं टेंशन नाही पण टेक्नीकल इश्यू व्हायचे. कधी फॉर्म जनरेट झाला नाही, कधी प्रोजेक्ट viva दोन महिने आधी आली... असं धडपडत कां होईना ते ट्रॅकवर आलं - वर्ष वाया गेलं पण त्या प्रॉब्लेम्सच्या नाकावर टिच्चून तगडा स्कोअर केला... ! जॉबकरता धडपडत होतो. तिथे सगळं उलटं व्हायचं... अगदी तोंडाशी आलेले घास गेलेले. एमएनसी मध्ये सुद्धा टिसीएस, डब्ल्यूएनएस फायनल राऊंडस् क्रॅक केले - पण कधी रेफरन्स आयडी, कधी रेसिडेन्स डॉक्यूमेंट तर कधी बोनाफाईड सारख्या तद्दन फालतू कारणांनी ते राहून जायचं... एबीपी माझावर सुद्धा - फायनल राउंडपर्यंत जाऊन माशी शिंकली... अगेन फ्रस्टेशन !
ते पंधरा - सोळा महिने मी सैरभैर झालो होतो...
..
माझ्याबरोबरच हे कां घडतंय ?
माझं काय चुकलं ?
डिटेल्स प्लान सह आयुष्य जगण्याची सवय असल्यानं तासंतास ते शोधण्यात जायचं...
आणि जूलै २०१५ एक दिवस मला एक मार्ग दिसला...
"पोर्टल"... आजोबांच्या मॅरेज ब्यूरोकरता एक वेबपोर्टल डिजाईन केलं, त्यात बरंच शिकलो, बारकावे समजले आणि व्हाय डोंट ट्राय धिस टिल गेट अ जॉब ? ... नंतर एक मिडीया पोर्टल सुरु केलं, छोटासा व्यवसाय उभा झाला. आणि मार्ग दिसला... पैसा - शिक्षण असं दोन्ही मिळवतांना व्यवसाय करायचा हे बिंबलं, घरुन साथ मिळाली... आणि नोव्हेंबर २०१५ पर्यंत आधाराने उभा झालो... मनाचं थोडंफार समाधान झालं, पैसा मिळू लागला... दरम्यान मित्र जमवून क्लासेस, फ्रीलान्स डेव्हलपमेंट सुरु झालं...
..
दरवर्षी डिसेंबर १५ ते १ जानेवारी या काळात मी माझ्या पुढच्या वर्षाचं डिटेल्स प्लान करतो, वय २४ : टार्गेट : स्वतःचा व्यवसाय उभा करायचा...
त्या प्लान मध्ये लिहीलेला शब्द ब्रह्मवाक्य !
शांततेत विचार करुन, एक एक गोष्ट ठरवून उडी मारत होतो. प्रत्येक गोष्टीत अपयश आलं, पण त्या अपयशाची x काढत मार्ग काढला... ! करीयरला दिशा मिळाली (वेग नाही ! ) ... दोन वर्ष तब्येतीच्या कुरापती सुरुच होत्या त्यामूळे अगदी मार्च एप्रिल २०१७ पर्यंत बहूतेक वेळ घरी धुळ्यातच काढावा लागला... अर्धा पुण्यात अर्धा धुळ्यात ! ... त्यामूळे जॉबचा विचार करण्याची हिम्मत झाली नाही... ! हेल्थ कमस् फर्स्ट... आणि सगळं खूप हळू हळू ठिकाणावर येत होतं... !
...
जाने २०१६ ते डिसें २०१६ वय २४ : ठरवल्याप्रमाणे व्यवसाय उभा झाला. प्रॉफीट नाही, पण रेव्हेन्यू रिटर्न सुरु झाले... करीयरला आकार (स्पष्ट सांगायचं तर : तोंड झाकण्याची जागा आणि मन थाऱ्यावर राहण्यासाठी वेळ) मिळणं महत्वाचं होतं... आर्थिक, व्यावसायिक, मानसिक आणि शारीरीक अश्या प्रत्येक आघाडीवरच्या कठीण काळात आई-पप्पा-तुषार-आजोबा आणि माझ्या प्रत्येक क्षणी खंबीर सोबत असलेली ती असे पाच लोकं सोडले तर जवळपास सगळेच उलटले होते... मी सैरभैर होतो, माझ्या नशीबाला कोसत होतो... माझ्या मनात त्या दिड वर्षात शक्य ते वाईट विचार आले, त्यावर कंट्रोल करून एक ध्येय ठरवलं... पण हातून गेलेल्या संधी, ते दडपण, वाईट वाटणं, तब्येत या गोष्टी फटकावत होत्या... तरीपण २०१६ संपता, वर्षाआधी ठरवल्याप्रमाणे माझी कंपनी उभी झाली... जॉबचा विचारही दूर गेला... २५ व्या वर्षी पुणे सोडून मुंबईत आलो, आणि २०१७ जून पर्यंत टि. के . प्रॉस्पेरीटी प्रा. ली. गृप तयार झाला, I am able to provide Jobs, पैसा उभा राहतोय.. ! सेट होतोय... माझं आयुष्य पूर्णपणे माझ्या कंपनीभोवती केंद्रीत झालंय... पाच सबसिडीअरीजचा गृप आहे... ३०-३५ ची टिम आहे ...
..
आज सकाळी फोन आला. जे चार मित्र तेव्हा माझ्यासोबत सिलेक्ट झाले होते - मी सोडून त्या चौघांनी तिथे जॉईन केलं, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर Recession मूळे शनीवारी त्यांना कंपनीनं कमी केलं... ते १ ऑगस्ट पासून माझ्या कंपनीत जॉईन करताय... त्याच पॅकेजवर - जे त्यांना त्या कंपनीनं दिलं.
..
कानात कुणीतरी उकळतं तेल ओतावं असं झालं... आणि मी किती मोठ्ठ्या संकटातून वाचलोय हे जाणवलं... जर मी तेव्हा जॉईन केलं असतं तर आज मी त्यांच्यासारखाच भयाण कड्यावर उभा असतो... एक मोठी जबाबदारी आत्ता अंगावर, मनावर आहे... आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर उभा आहे... या क्षणी जॉब गेला असता तर माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्थ झालं असतं... ! तीन वर्षांपूर्वी एक रात्र होती ज्यात मी तडफडत होतो, रडत होतो - आजपर्यंत झालेल्या प्रत्येक त्रासाकरता २९-३० मधल्या त्या रात्रीला मुक्त शिव्या घालत होतो... माझ्या नशीबाला, देवालाही सोडलं नाही... पण त्या रात्रीनं माझे तीन वर्ष बिघडवून अख्खं आयुष्य घडवलंय... ! माझी कंपनी, माझं भविष्य फक्त त्या रात्रीमूळे घडलंय... उभं राहीलंय... !
जर ते नसतं झालं तर व्यवसाय मनातही नसता... !
...
"जे होतं ते चांगल्यासाठीच होतं" हे मला त्या कठीण काळात आई-पप्पांनी सांगितलं, धीर दिला...
ते शब्द खरे ठरले... आज प्रचिती आली... !
पुढे पण जे होणार ते चांगलंच होणार... !
वाईट काळ नेहमी काहीतरी चांगलं देऊन जातो... !