महागुरुंचं सुवर्णमहोत्सव
म्हाग्रुनी काल दे ढील लै बफाऱ्या सोडल्यात... फुल्ल ऑन मज्जा... गेलेल्या माणसाबद्दल काहीही बरळलं तरी खरं खोटं करायला कुणी येणार नाहीय, या तत्वाचा पूरेपूर लाभ घेत आया मौका मार दिया चौका अशी मस्त बॅटींग केलीय... . हा माणूस कधीही पटलेला नाही. ओव्हरअॅक्टींगमध्ये ऑस्कर मिळावं अशी हूच्च प्रतिभा धारण करतात... संवादफेक तर विचारू नका... नवरा नवसाचा, सातपूते, आयडीयाची कल्पना असले टूकार चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्यात या साठ वर्षांच्या माणसाबरोबर पंचवीशतली एखादी ठूमकतांना दिसली की वाईट्ट कॉम्प्लेक्स येतो. त्यावर उतारा म्हणून हॉलीवूड बघावं लागतं... .. म्हाग्रु सहकलाकारांना श्रेय देण्यात सॉलीड कंजूषी करतात. स्वतःभोवती दिवे ओवाळतांना त्यांना आपण काय बरळतोय याचं भान हरवतं. बनवाबनवी वेळी अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेंनी भर रस्त्यात पायावर डोकं ठेवलं, ते अमिताभ बच्चन, अमजद खान यांच्या पेक्षा सिनीयर आहे - त्यांना अॅक्टींग शिकवली असं काही काही बरळून त्यांनी स्वतःची किंमत कमी करून घेतलीय. बनवाबनवीचं जास्त श्रेय लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुधीर जोशी यांनाही जातं... पण दरवेळी त्...