Sarahah - Be Careful Be Alert

#Sarahah बद्दल उत्सुकता म्हणून ठीक, पण ते अॅप खूप सिरीयसली न घेतलेलं चांगलंय... रॅदर, स्त्रियांनी, मुलींनी तर आधीक सतर्कतेने त्यापासून दूर राहणं योग्य आहे.. Precaution is always better than cure ! फॉर ऑल -  नंतर थोबाड बडवण्यापेक्षा आधीच ती वाट बंद केलेली चांगली... !
..
त्यात Sender कोण ते कळत नाही, रिप्लाय देऊ शकत नाही. त्यामूळे गंमत म्हणून थोडक्यात ठिक, पण एका मर्यादेपलीकडे या अॅपचा धोका निर्माण होईल...
कुणीतरी भिंतीपलीकडून अश्लील कमेंटस् पास करू शकतो... (स्त्रियांसाठी विशेषतः ! एकतर्फी मरणारे, प्रेमभंगे वगैरे)
कुणीतरी व्यंगावर टिका करू शकतो...
धमकी देवू शकतो...
नात्यात गैरसमज पसरवू शकतो...
ऑफीसमध्ये भांडणं लावू शकतो...
वैयक्तीक टिका, दुखरी / हळवी बाजू टोचू शकतो...
आपल्यावर जळणारे हजारो असतात, ती माणसं मानसिक खच्चीकरण करू शकतात... !
खूप धोके आहेत.
सध्यातरी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर Sarahah ची सिक्यूरीटी ब्रेक होत नाही.
..
समजा,
- दोन मित्रांत वाद झाले - बदला घेण्यासाठी किंवा टाईमपास करायला एकाने दुसऱ्याच्या बायकोला मेसेज पाठवला - "तुझ्या नवऱ्याचं ऑफीसमधल्या x सोबत लफडं आहे..." ...
- "ओ काका, तुमची मुलगी मरीन ड्राईव्हच्या कपारीत बसलीय त्या xy सोबत... " मुलगी येईपर्यंत काकांना धडधड...
- ऑफीसमध्ये पण एखाद्याला लटकवण्यासाठी बॉसला मेसेज केला - सर, उसने आपको गंदी गाली मारा.... संपलं !
- माझ्या जवळच्या मित्राला एक मेसेज आलेला त्याने फुल्ल डिप्रेस माईंडनं दाखवला - "xxव्या... साधा ग्रॅज्यूऐट नाहीय, इंजिनीअर पोरीवर लाईन मारतोस...." 
त्या पोराचे प्रॉब्लेम त्याला माहिती, पण बोलणाऱ्यानं घाण केलीच ना त्याच्या मनात...
- एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला खिजवण्यासाठी एखाद्या नातेवाईकानं - x औकात काय रे तुझी ? विचारलं तर ?
..
- मला ऑफीसमध्ये कुणीतरी स्टाफनं पाठवला,
इथे मला काम करण्यात समाधान वाटत नाही, मी माझं १०० % देणार नाही, मला माझ्या फिल्डमध्ये हवंय... तुमचं नुकसान होतंय त्याबद्दल सॉरी...
त्यामूळे आता दोन दिवस तो / ती कोण आणि काय नुकसान करून ठेवलं हे शोधण्यात वेळ जातोय... सगळ्यांकडे संशयानं पाहिलं जातं..
...
अव्यक्त प्रेम व्यक्त होतं - डोंबलं ! कोण व्यक्त करतंय ते कसं कळणार... ? तिने / त्याने भलतंच कुणीतरी समजून त्यांना होकार द्यायचा... पाठवणारा देवदास !
अंधेरेमे तीर क्यो मारनेका ?
दम असेल तोंडावर विचारा, हो म्हणेल किंवा नाही म्हणेल...
..
अरबांनी बनवलं, कां कशासाठी ते त्यांचा प्रश्न. पण आपल्याइथं य.झ.ची कमी नाहीय... त्यामूळे चांगल्या गोष्टीचं श्राद्ध घातलं जातं... एखाद्या पोरीनं आयडी दिला रे दिला की छोटे ते म्हातारे तिथे गूळ पाडायला जातात. काही तिच्यावर खालच्या लेव्हलला उतरुनही कमेंट करतात... पॉलीटीकलवाले पर्सनलवर उतरतात... जळफाटे तिथे येऊन धूर सोडतात... प्रत्यक्षात ज्याची औकात समोर उभं करण्याचीही नसते ते येऊन भिंती आडून आपल्याला शिकवतात...
..
परीणाम : किळस, मानसिक खच्चीकरण... फार सिरीयसली घेतलं तर डिप्रेशनही होवू शकतं... आपण चुकत असू तर आपले जवळचे लोकं तोंडावर सांगतिल, पण त्यासाठी थर्ड पर्सनचा व्ह्यू कशासाठी ? आपण काय - कसे हे त्या व्यक्तीला कां सांगावं ?
७० लोकं म्हणाले तुम्ही खूप चांगले (गूळ पाडला...) उरलेल्या ३० नी घाण केली तर ? मानसिक खच्चीकरण, विकृती, जळफाट, आसुरी आनंद यासाठी ते लेव्हल उतरले तर ?
...
सो, मित्रत्वाच्या नात्यानं फुकट सल्ला देतो..
- त्या वाटेला जावू नका.
- गेलात तर जास्त दूरपर्यंत जावू नका...
- दूरपर्यंत गेलात तर सिरीयसली घेऊ नका...
नकारात्मक -ve कोसळण्याला लिमिट नाही... मनाचं गणित कठीण असतं !
आपल्या नकळत फटका बसला तरी महागात जातो !
..
चांगली बाजू निश्चित आहे, पण A drop of lemon juice would destroy the entire milk.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved