Independence Day
कचरा डस्टबीन शिवाय इतर कुठेही टाकत नाही...
पान-सिगारेट सारख्या फालतू सवयी नाहीत त्यामूळे रस्त्यावर थुंकण्याचा प्रश्न येत नाही...
रेड सिग्नलला xमस्ती टाळून गपगूमान उभं राहतो...
ट्राफीक रुल्स पाळतो...
दर ५ वर्षांनी मतदान करतो..
बापाचा रोड समजून डिजे ठोकत रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि स्वतःबरोबर इतरांचीही आमटवणाऱ्या मिरवणूकांना जात नाही...
गरज असेल तितकंच पाणी, विज आणि पेट्रोल वापरतो...
पिकनिकला गेल्यावर तिथल्या वास्तूवर स्वतःचं नांव कोरुन येत नाही...
गार्डनमध्ये बसल्यावर गवत उखडत नाही ...
कॉमन टॉयलेटमध्ये शू केली तर पाणी टाकून प्लश करतो..
..
माझी देशभक्ती १५ ऑगस्टच्या अर्ध्या तासाची मोहताज नाही... ना ती कुणाचं गुणगान गायल्यानं सिद्ध होते... भाषेचं बंधन नाही.. प्रांताचं तर बिलकूल नाही ... !
फॉर मी हिस्ट्री मॅटर्स सिन्स माय बर्थ...
देश हातात मिळालाय, तो टिल एंड ऑफ द लाईफ आपल्यापरीनं जपायचाय... दॅटस् ऑल !