SEO and Google Policy

गुगल आजच्या घडीतले सर्वोत्तम सर्च इंजिन आहे. गुगल शिवाय काही सर्च करणे हा पर्यायच आता सहन होत नाही. 

तुम्ही एखादे प्रॉडक्ट लॉन्च केले असेल तर ते इतरांना दिसण्यासाठी तुम्हाला paid services वापराव्या लागतात. त्याला SEO म्हणजेच Search Engine Optimization म्हणतात. झोल हा आहे की तुमचे प्रॉडक्ट कितीही दमदार असले तरीही तुम्ही SEO techniques वापरत नसाल तर google search results च्या पहिल्या काही पानात तुमचे प्रॉडक्ट दिसतच नाही.

धोका हा आहे की याच्यात सर्वांना समान संधी मिळत नाही. जे google paid services वापरतात त्यांनाच मान मिळतो, भले प्रॉडक्ट भिकार असेल तरी चालेल. याचा अर्थ तुम्हाला काय शोधायचे आहे ते महत्वाचे नसून googleला जे दाखवायचे आहे तेच दाखवणार. Europe Union मध्ये Antitrust नियमानुसार सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, google ने monopoly करत बरेच सर्च रिझल्ट्स बदलले ते कायद्याविरोधात होते. म्हणून EU ने तब्बल 2.7 बिलियन्स पाउंडचा गुगलला दंड ठोठावला आहे आणि गुगलला झक मारत तो भरावा लागणारच.

Google India पण हेच करत असते पण भारताच्या कायद्यांना काहीही पडलेली नाहीये, किंबहुना असा कुठला कायदा असेल याचीही शाश्वती नाही आहे.

असंच Whatsapp बद्दल user privacy issue वरून फ्रांसने 122 मिलियन डॉलर्सचा फेसबुकला दंड ठोठावला होता. भारतात फक्त कमिटी नेमणार आहेत.

Internet Usage मध्ये भारत बरच progressive असलं तरी अधिकार, कायदे याविषयात जनतेपासून सरकारपर्यंत ठार अंधार आहे.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved