Career Vs. Family
मुंबईतला एक माणूस यूएसला गेला, २० वर्ष तिथे राहीला... मुंबईतल्या घरी एकटी आई होती. दिड वर्ष तिला साधा फोन करायला त्याला वेळ मिळाला नाही... ती मेली की जिवंत आहे हे बघायलाही वेळ नव्हता आणि मुंबईत आल्यानंतर त्याला घरात त्या वृद्धेचा सांगाडा दिसला... एबीपीवर न्यूज सुरूय.
..
आयटीतली - माझ्या ओळखीतली करीअर ओरीएंटेड मुलगी फक्त हाय क्लास लाईफस्टाईलकरता घरापासून दूर ४०० किमी वर पुण्यात राहते... आणि १५-१५ दिवस तिच्या आईवडीलांना फोनही करत नाही... ६-६ महिने भेटही नसते... तिची आई पोरीशी बोलायला तडफडते...
..
ज्या आईवडीलांनी जीव तोडून सांभाळलं त्यांना जर आपल्याशी बोलायला तरसावं लागेल, त्यांना इमोशनल सपोर्ट देऊ शकणार नाही तर लाथ मारावी अश्या आयुष्याला... दोन चार लाख कमी मिळाले तर चालतील पण आई-पप्पा-आजी-आजोबा-भाऊ-बहिणी रिलॅक्स / समाधानात हवे... एक तर एकत्रच रहायचं, नसेल शक्य तर इच्छा झाली की दोन-चार तासात त्यांच्यापर्यंत येता येईल असं रहायचं... ते पण त्यांना आपल्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वाट बघावी लागणार नाही असं.
..
समजा,
वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत घरापासून, कुटूंबापासून दूर राहत / न भेटत न बोलत दहा-वीस कोटी कमावले - त्या धुंदीत घरात वेळ दिला नाही, सोहळे अनुभवले नाहीत, शांत झोप घेतली नाही आणि एकतिसाव्या वर्षी हार्ट फेल होवून मेलो तर पैसा बांधून न्यायचाय सोबत ? काय जगलो ?
तेच, पन्नाशीपर्यंत बक्कळ पैसा कमावला, सो कॉल्ड हाय क्लास लाईफस्टाईल जगलो (लाईक - नो फॅमिली, नो गेस्ट) आणि पन्नासाव्या वर्षी उपरती आली - आता घरी थोडा वेळ देवूयात... - पण तेव्हा आई वडीलांशी बोलायला ते तर हवे..
..
पैसा, करीयर हे ५० % ... घर, कुटूंब ५० %...
कुटूंबासाठी पैसा आहे. करीयर - प्रसिद्धी - यश हे जेव्हा कुटूंबापेक्षा - आईवडीलांपेक्षा वरचढ ठरतं तेव्हा आपल्यातला माणूस संपतो आणि यंत्र उरतं...
पैसा सर्वस्व नाही... ड्रिंक्स, राईडस्, मूवी, शॉपिंग यापेक्षा जास्त भारीतला विकएंड घरी फॅमिली बरोबर गप्पा करण्यात आहे, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात आहे.
..
करीअर ओरीऐंटेड मुली, ज्या घरापासून दूर आहेत - घरी १५-१५ दिवस फोन करत नाही, ६-६ महिने भेटत नाही,
नंतर लग्न झाल्यावर माहेर काय आठवेल ?
आपलं सोडा, त्या आई वडीलांचा तर विचार करायचा...
आपण जर त्यांच्यासाठी वेळेवर येऊ शकलो नाही तर काय उपयोग ? तुम्ही सासरी जातांना आठवून रडू येईल इतक्या आठवणी तर हव्यात. जर सहवास मिळाला नाही तर सासरी जा किंवा मेट्रोत जा - कुणाला फरक पडणारे ?
माझ्या बायकोलाही (वूड बी) माहेरी जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी मी अडवणार नाही... आफ्टरऑल तिच्यासाठी तिचे आईवडील आधी ! मी नंतर... ! जी घरी कुटूंबासोबत राहते, तिच्या आईवडीलांना, भावंडाना पुरेसा वेळ देते तीच मुलगी माझ्या आयुष्यात आहे... And I am happy with her.
...
यूएसचा एक प्रोजेक्ट तिथे सहा वर्ष रहावं लागणार म्हणून आईपप्पांनी घेऊ दिला नाही,
आणि तो नाकारतांना मलाही वाईट वाटलं नाही -
त्या ४ कोटीपेक्षा आईपप्पा महत्वाचे... खूप छान वाटलं, समाधान वाटलं... धुळ्याहून पुण्यात जातांना, पुण्यातल्या आणि मुंबईतल्या दोन्ही घरी माझ्यासाठी पाण्याच्या बाटली पासून लहान लहान गोष्ट सुद्धा जीव तोडून आई पप्पा करतात... तेव्हा आपण जर दूर गेलो, काही दिवस बोलू शकलो नाही तर या जीवांचं काय होईल ही जाणीव धडकं भरवते... भले पैसा नाही मिळाला तर चालेल पण आईपप्पांपासून दूर राहण्याची वेळ येऊ द्यायची नाही.
..
माणूस मरतो त्यानंतरचे तेरा मिनिटं अख्खं आयुष्य रिव्हर्सली फ्लॅशबॅक होतं...
त्या तेरा मिनिटांवर हक्क आपल्या करीयरचा, डिग्रीचा, मित्रांचा, सहकाऱ्यांचा नसतो. तर आईवडील, भाऊ बहीणी, आजी आजोबा, बायको मुलं, सोहळे यांचा असतो...
आपल्या करीयर-पैसा-लाईफस्टाईल मध्ये आई वडीलांना दुय्यम स्थान असेल तर आपलं आयुष्य जिवंतपणीच राख झालंय हेच खरं !
- तेजस कुळकर्णी