महागुरुंचं सुवर्णमहोत्सव

म्हाग्रुनी काल दे ढील लै बफाऱ्या सोडल्यात... फुल्ल ऑन मज्जा... गेलेल्या माणसाबद्दल काहीही बरळलं तरी खरं खोटं करायला कुणी येणार नाहीय, या तत्वाचा पूरेपूर लाभ घेत आया मौका मार दिया चौका अशी मस्त बॅटींग केलीय...
.
हा माणूस कधीही पटलेला नाही. ओव्हरअॅक्टींगमध्ये ऑस्कर मिळावं अशी हूच्च प्रतिभा धारण करतात... संवादफेक तर विचारू नका... नवरा नवसाचा, सातपूते, आयडीयाची कल्पना असले टूकार चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्यात या साठ वर्षांच्या माणसाबरोबर पंचवीशतली एखादी ठूमकतांना दिसली की वाईट्ट कॉम्प्लेक्स येतो. त्यावर उतारा म्हणून हॉलीवूड बघावं लागतं... 
..
म्हाग्रु सहकलाकारांना श्रेय देण्यात सॉलीड कंजूषी करतात. स्वतःभोवती दिवे ओवाळतांना त्यांना आपण काय बरळतोय याचं भान हरवतं. बनवाबनवी वेळी अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेंनी भर रस्त्यात पायावर डोकं ठेवलं, ते अमिताभ बच्चन, अमजद खान यांच्या पेक्षा सिनीयर आहे - त्यांना अॅक्टींग शिकवली असं काही काही बरळून त्यांनी स्वतःची किंमत कमी करून घेतलीय. बनवाबनवीचं जास्त श्रेय लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुधीर जोशी यांनाही जातं... पण दरवेळी त्यांना डावललं गेलं आणि म्हागूनी दिग्दर्शक होण्याचा पूरेपूर लाभ घेतलाय.
.
जुने काही चित्रपट सोडले तर - त्यातली त्यांची एक्टींग खरच चांगली होती पण हल्लीचे म्हाग्रूचे चित्रपट तद्दन बकवास, प्रॉडक्टची जाहीरात किंवा स्वतःभोवती ओवाळण्यासाठीच असतात... त्यामानाने अशोक सराफ, विजू खोटे, मोहन जोशी, भरत जाधव वगैरे मंडळी बऱ्याच अंशी अश्या प्रसिद्धीपासून दूर आहेत... ! त्यांना ना बाउंसर्स लागत ना कधी स्वतःचे कौतुकसोहळे.
.
"पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका - मीच विनवते हात जोडूनी पुड्या मोठ्या सोडू नका" 
असं त्यांची (सो कॉल्ड) कारकिर्द तर म्हणत नसावी ?
.
नवरा नवसाचा हा बॉम्बे टू गोवा धर्तीवरचा चित्रपट आहे, पटकथा तद्दन बकवास, ट्रॅकलेस. शेवटी सगळे एकत्र एकाच ठिकाणी येतात. अनुत्तरीत चित्रपट आहे. आयडीयाची कल्पना फक्त स्टँड अप कॉमेडी लेव्हलचा चित्रपट आहे, सातपूते एका जुन्या हिंदी चित्रपटाची कॉपी आहे...
..
डाइरेक्टर ते स्पॉट बॉय सगळी कामं ते एकटेच करतात , वन मॅन आर्मी आहेत ते, एकापेक्षा एक पहिल नाही का ? 
शो त्यांचा आणि स्वयंघोषित महागुरू पण तेच होते.
ओव्हरऑल "हे घ्या शंभर रूपये"

#महागुरु

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved