Interest Down By Reserve Bank
व्याजदर ६.२५ % वरून ६% झाला...
उर्जित पटेल हा व्याजदर जोपर्यंत ५% वर येत नाही तोपर्यंत झक मारणार... एकदा ५% झाला की म्हातारीच्या "आता मी डोळे मिटायला मोकळी"च्या धर्तीवर चैन की साँस वगैरे घेणार...
हमारे जमाने मे - ७.५% हूवा करता था... वगैरे डायलॉग ऐकले आजच.
रिजर्व बँकेचं पतधोरण जाहीर झालं, उर्जित पटेल राहिला बाजूला बँकेत मोदी-जेटलींच्या नावे ऐन श्रावणात शिमगा झाला... !
..
रघुराम राजन अॅटलिस्ट स्वयंभू होते,
सांभाळून घ्यायचे.
उर्जित पटेल साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणा होता होता दिडशहाणा झालाय..
वाजपेयी सरकारचीच चूक पुन्हा मोदी सरकार का करतंय कळत नाही.
व्याजदर कमी केल्याने कागदावर इन्फ्लेशन कमी झालेले दिसते पण बाजारात त्याचा दृष्य परिणाम कधीही दिसत नाही हा आजवरचा अनुभव आहे .
बाजारातून खेळता पैसा काढून घेण्याची पुस्तकी आहे . किंवा हाच पैसा लोकांनी शेअरबाजारात अधिकाधिक गुंतवावा म्हणून .
विकसित देशात व्याजदर ०.५% ते १.५% असतात . आपली अर्थव्यवस्था विकसित नाही .
म्हातारी वयोवृद्ध सत्तरी पंचाहत्तरीतील माणसं ठेवीच्या व्याजावर तर अवलंबून असतात.
ती कुठे जाऊन कामधंदाही करू शकत नाहीत.
शेअर मार्केटमध्येही पैसा उतरवून रिस्क घेण्याची त्यांची क्षमता नसते .
कार्पोरेशन्स टॅक्सेस कमी करत नाहीत. बस -रिक्षा-एसटी प्रवास स्वस्त होत नाहीत . शेतकरी आणि व्यापारी कमी हमीभाव स्वीकारत नाहीत. हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स त्यांच्या फी आणि रेट्स कमी करत नाहीत .
त्यांचे कोणतेही खर्च कमी होत नाहीत पण उत्पन्न मात्र कमी होतं .
फायदा फक्त कर्जाच्या व्याजांचे दार कमी होण्यात होतो आणि शेअर मार्केट मध्ये जास्त पैसा येण्यावर होतो . ज्याचा वृद्धांवर काही फरक पडत नाही . ते ना गाडी घ्यायला जातात ना घर घ्यायला . राहती घरे विकायची वेळ त्यांच्यावर आणू नका .
तो तुमचाच मतदार आहे. तुमच्यासाठी सकाळी अंघोळ-देवपूजा करून मतदान करायला हालचाल जमत नसताना उत्साहाने बाहेर पडलेला .
ते म्हणजे व्यावसायिक नव्हेत . व्यावसायिकांचा तोटा हा न्फयातील तोटा असतो पण या लोकांचा तोटा मुद्दलातील होतो. जो पुन्हा भरून येत नाही .
शेअर मार्केट नाही नव्या उच्चान्काला गेलं तरी चालेल .
खूप झालं .
त्यांना गृहीत धरू नका
ते लाजेकाजेस्तव रस्त्यावर दांगडू घालू शकणार नाहीत पण मूक रडतील.
आणि त्यांचे जगणं मुश्किल करून शिव्या शाप घेऊ नका .