ती आणि मी
आमच्यातलं सगळं आलबेल असण्याची खूण म्हणजे "ए आहो" बोलणं... बायको माहेरी गेल्यावर फोनवर तो एकच शब्द हजार शब्दांचा धीर देतो... एकाच शब्दात एकुण सिच्यूएशनचा अंदाज येतो...!
..
पूर्वी पत्र लिहीतांना वर श्री लिहायचे, त्यातच सगळं सुखरुप असल्याचं समजायचं...
श्री नसेल तर घरातल्या बाया शेजारच्या चार बाया गोळा करुन कुणाची काय खबर हे न बघताच गळे काढणं सुरु करायच्या,
...
तसंच, फोन वर "ऐ आहो" ऐकलं नाही की पुढे नक्की काय वाढून ठेवलंय या विचाराने हार्डची धडधड एक्स्प्रेसच्या स्पीडनं डबल होते, आणि अंधारात तीर मारत, सावधपणे आपल्या कर्माची एक एक गोष्ट आठवून अंदाज घेणं सुरु होतं...
कारण सापडलं तर ठीक,
नसेल तर पॅराशूट मध्येच अडकून गेल्याची फिलीँग येते, आणि ती आपल्याला भलत्याच पद्धतीने टोलवत राहते...!
...
टिप : कधी अश्या परिस्थितीत अडकलात तर चुकूनही आपल्या चुकांची गिणती बायकोसमोर करु नका... अंदाज घ्या... कारण काहीवेळा भलतंच असतं, देणं ना घेणं आपलं स्वत:च्या हाताने ओढवलं जातं.