देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others
एकीकडे -
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस...
.
दुसरीकडे -
उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी,
हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी...
आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...!
..
याचं कारण एकच :
योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...!
..
महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला...
त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली,
आणि त्यांनी त्याचं सोनं केलं.
राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं,
या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं,
तरीही संयम न ढासळू देता त्यांनी आपलं काम सुरु ठेवलं,
हेलीकॉप्टरचा अपघात झाल्यावर हा मरायला हवा, टरबुज्याच्या वजनाने कोसळलं वगैरेही त्यांनी शांतपणे ऐकलं...
तरीही, पंधरा वर्षांची भ्रष्टाचाराची कीड साफ करुन सुशासन देण्यासाठी या माणसाने आपला संयम ढळू न देता प्रयत्न केला...
..
पाच वर्ष अल्पमतातलं सरकार चालवणं सोप्पं नाही...
त्यातही उपद्रवी पक्षाशी युती करुन !
शरदीय डावपेच या माणसाच्या बुद्धीसमोर फिके पडले आणि साहेब सैरभैर झाले...!
राजाभौ आणि तत्सम मंडळी भ्रमिष्ठ झाली...
केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस यांनी सुशासनाचा पाया घातला,
महाराष्ट्राने बदल अनूभवला...
कारण आपल्याला अभ्यासू, शिकलेला, सुशिक्षित आणि सभ्य माणूस मुख्यमंत्री म्हणून लाभला होता...!
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही...
..
२०१९ ला "देवेंद्र गंगाधरराव फडणवीस" यांना जेव्हा "महायूतीचे" मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं तेव्हाच महाराष्ट्राने भाजपा-सेना-मित्रपक्ष यांना स्पष्ट बहूमत दिलं... हे या माणसाने कमावलंय...!
..
जेव्हा जनता सोडून सगळे विरोधात बोलतात तेव्हा समजायचं की राजा प्रामाणिक आहे... चाणक्य बोलले म्हणे, आज तेच पटतंय !
..
असं कां ? -
भाजपा सोडून इतर सगळे पक्ष कुठल्यातरी घराण्याचं तिर्थ पितात, त्यामूळे कुठलाही बिगर भाजपा मुख्यमंत्री निष्ठा त्या घराण्याशी वाहणार हे उघड असतं, किंवा घटनाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण होतं... जसं कॉंग्रेसचं दिल्लीत, राकाँचं बारामतीत, सेनेचं मातोश्रीवर, कधी मनसेची सत्ता आलीच तर कृष्णकूंजवर...
फडणवीसांचं कुठे ?
तर मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर... जिथे असायला हवं तिथेच !
..
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणात हाच एकमेव माणूस आहे जो सगळ्यांना प्रामाणिकपणे पूरुन उरलाय..!
...
संजूभौ आणि शर्दरावच्या कृत्याने आणि आपल्या दुर्देवाने फडणवीस कदाचित उद्यापासून मुख्यमंत्री नसतील, पण त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा दिलीय हे मात्र खरं ! पुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगली माणसं घेवून फडणवीस पुन्हा बिनायूतीची एकहाती सत्ता मिळवतील या विश्वासासह... !
- तेजस कुळकर्णी