पितृपक्ष.

"आपण", आपलं असणं हे एक चैतन्य आहे, उर्जा, शक्ती... शरीर नश्वर असलं तरीही आत्मा चिरंतन आहे. शरीर फक्त एक माध्यम. आपलं मन, आत्मा, जीव म्हणजे चिरंतन उर्जा. त्या आत्म्याला भावना आहेत, गरजा आहेत. भावना, इच्छा, विचार, अस्तित्व यांचा संगम म्हणजे आत्मा... आत्मा शक्ती आहे. उर्जा आहे. तिला स्वभाव आहे. According to the first law of thermodynamics, also known as Law of Conservation of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्तीला जन्म मृत्यू नाही, ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते. शरीर मरतं, नष्ट होतं पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर सोडल्यानंतरही तो अदृष्य रुपाने आपल्या भोवती जीवन जगत असतो. मृत्यूपश्चातही त्याच्या भूक, तहान, इच्छा या सवयी सुटत नाही. त्या पूर्ण करण्यासाठी तो धडपडत राहतो. पाणी, वीज, प्रकाश, हवा जसं पुढे जाण्यासाठी द्वार शोधतात तसंच आत्मा देखील पूर्नजन्माचं द्वार दिसलं की नव्या शरीरात जन्म घेऊन तो त्या गरजा पूर्ण करून घेतो. युगांनूयुगे ही क्रिया सुरू आहे... मोक्ष वगैरे गोष्टी नाहीयेत, एखादी गोष्ट जाळल्यानंतरही कधीही न नष्ट होणारी राख राहते, प्रकाश, वायू कसा विसर्जन कराल ? शक्तीला मुक्ती नाही.. जन्म - मृत्यू - पुर्नजन्म ही क्रिया अखंड आहे.
..
पण पूर्नजन्म होईपर्यंत काय ? त्याच्या गरजा कशा पूर्ण होतील ? तर तोपर्यंत आत्मस्वरूपात ती व्यक्ती असते. त्या अवस्थेला आकार, रंग, वस्तूमान, गंध, स्पर्श नाहीय... ती प्रकाश वायू जल कुठल्याही अवस्थेतून मुक्त संचार करू शकते. भौतीक गुणधर्म नसले तरीही, त्या शक्तीला भूक, तहान, इच्छा असतात. आपल्या बरोबरच त्यांचं विश्व असतं... आणि ती शक्ती तहान, भूक या इच्छांची पूर्तता आपल्या अग्रजांकडून करून घेते... त्याची जाणिव करून देते..
..
मानवी स्वभावाप्रमाणे आत्मा असतो. शरीर मरतं - स्वभाव, व्यक्तीमत्व, विचार हे चिरंतन असतात. गजानन महाराज, स्वामी समर्थ, अजमेर शरीफ, हाजी अली दैवी पुरुष होते, त्यांनी मानवी शरीर घेतलं - कार्य केलं, ते शरीर टाकलं. पण आत्मारुपाने आजही भक्तांना प्रचिती देतात... प्रत्येक व्यक्ती वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा, काळजी वेगळी... त्यानुसार आत्माही वेगळा... एखादं लहान मूल भूक लागल्यावर रडतं, तसं हे मृतकही आपल्या तहान भूकेची गरजांची इच्छांची जाणिव करून देतात... स्वभावाप्रमाणे... इच्छेप्रमाणे... काही सौम्य काही तडाखे देतात.
.
त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची पद्धत म्हणजे श्राद्ध... मृत्यू - जन्म यांतली अदृष्य भिंत ओलांडून त्यांना आवाहन करून, जेवायला देऊन तृप्त करण्याचा हा विधी.. जन्म - मृत्यू यांत संपर्क करायचा ब्रिज... भूक लागली आणि जेवायला मिळालं नाही तर चिडचिड होते, तसंच जर श्राद्ध झालं नाही तर त्या आत्म्यांची चिडचिड होते, हेच ते पितृदोष वगैरे लागणं. श्राद्ध कर्म व्यवस्थित झालं की ते तृप्त होतात, आशिर्वाद देतात... ज्या घरात श्राद्ध यथाशक्ती व्यवस्थित होतं त्या घरी कुठलीच कमतरता नसते... सवाष्ण/पितृस्थानी बसलेले ब्राह्मण, कावळा या रुपानं ते आत्मे येतात जेवतात आणि तृप्त होतात. वर म्हणालो तसं ती शक्ती कुठल्याही अवस्थेतून मुक्त संचार करू शकते.
..
मृत्यूपश्चातही आयुष्य आहे.
आध्यात्म तर सांगतंच, पण विज्ञानही ते नाकारत नाही.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved