छोट्या गोष्टी..... भुताच्या
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो.
चार दिवस उलटल्यानंतरही मूल आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं.
बाप- तुला काही विचारायचं का?
मुलगा- आई सतत तुमच्यामागे का उभी असते?
===========
मध्यरात्री जाग आली. १२ वाजून ७ मिनिटं झाली होती. तिने तिची लांब नखं माझ्या छातीत घुसवली होती. दुसर्य़ा हाताने ती माझं तोंड दाबत होती.
मी खाडकन् जागा झालो. स्वप्न होतं ते. जीव भांड्यात पडला. घड्याळात पाह्यलं. १२ वाजून ६ मिनिटं झाली होती. बाथरूमचा दरवाजा मधोमध फाटला होता.
=============
मुलगा: बाबा आपल्या घरात भुत आहे.
वडिल: भुत वगैरे काही नसते, कोणी सांगितले तुला हे सगळे.
मुलगा: आपल्या घरातील मोलकरीण सांगत होती.
वडिल: चल सामान बांधायला घे आपल्या घरात भुत आहे.
मुलगा: पण तुम्हीच म्हणाले भुत नसते.
वडिल: हो बेटा पण आपल्या घरात मोलकरीण पण नाही.
=============
बायकोने रात्री उठवलं. कोणीतरी घरात शिरलंय हे सांगताना ती पांढरीफटक पडली होती.
दोन वर्षांपूर्वी रात्री एका दरोडेखोराने तिचा खून केला होता.
=============
काचेवर टकटक झाली आणि मी जागा झालो. मला वाटलं कोणीतरी खिडकीवर टकटक करतंय.
...पण तो आवाज आरशातून येत होता.
=============
मुलाला उठवायला त्याच्या बेडरूममध्ये गेलो. त्याला हलवलं तर तो म्हणाला, पापा या कॉटखाली एक राक्षस आहे तो मला टोचून, टोचून बेजार करतोय.
मुलाच्या समाधानासाठी मी कॉटखाली पाह्यलं. तिथे माझाच मुलगा होता. चेहरा पांढरा फटक, थरथर कापत त्याने विचारलं, पापा कॉटवर कोण झोपलंय?
-
(साभार)