Posts

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत...

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्य...

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड...

Sushant...

चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं,  जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही...  बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प...

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा (साभार : सोर्स - अज्ञात )

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा काही दिवसांपूर्वी ट्रम्प तात्या यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी भारताला धमकी दिली आणि भारताने घाबरून लगेच औषध सप्लाय केले अशा बातम्या आल्या होत्या. खरेतर तात्यांनी धमकी दिलीच नव्हती, पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहता फक्त तेवढी क्लिप पाहील्याने आपल्याकडे लगेच त्यांनी धमकी दिल्याचा आणि त्या धमकीमुळे 56 इंची छाती फाटल्याचा उद्धार झाला होता. आपल्याकडे मूर्ख बनवायला पूर्ण व्हिडिओतून कट केलेला एक तुकडा दाखविणे पुरते. म्हणून ट्रम्पची धमकी असो की आलू बनाने की मशीन, या व्हिडीओजद्वारे दुसऱ्याला मूर्ख समजणारांना हेच कळत नाही की मूर्ख ते स्वतःच बनले आहेत. असो, तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर असल्याने कोविड-19साठी (त्याला करोना म्हणू तेच बरे वाटते) भारत हा जगाचा आधारस्तंभ ठरला. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अतिशय स्वस्त औषध आहे, त्यामुळे ते जर करोनावर प्रभावी ठरले तर सगळ्या जगासाठी ते एक वरदान ठरणार होते.  पण जे जगासाठी वरदान ठरते ते अनेक फार्मसी कंपन्यांसाठी शाप ठरू शकते. कारण जर समजा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन करोना...

Shriyan and Songs

Image
माझ्या लेकराला दोन-तीन दिवसापासून twinkle twinkle little star गाण्याचा नाद लागलाय... त्याआधी कुठलंसं हिंदी गाणं होतं... बहुतेक "आपकी आँखोमे कुछ..." होतं..., त्याआधी किलबील... त्याच्यासमोर प्ले झालं आणि आवडलं... तिथून पारायणं सुरु होतात - जोपर्यंत दुसरं आवडत नाही तोपर्यंत... ... गर्भसंस्काराच्या काळात आम्ही त्याला प्रकृतीप्रमाणे - वेळा सांभाळून राग ऐकवायचो - कधी मी गायचो कधी त्याचा मामा, - किंवा रोजचा रियाजही समोर बसवून व्हायचा. त्यामूळे बहुतेक त्याचं गाणं उपजत आलंय, आणि जर तेच राग जर ऐकवले तर त्याचं एक्स्प्रेशन जबरदस्त असतं...  ... गाण्याचंही असंच - तेच तेच गाणं लूप मध्ये प्ले करावं लागतं, संपलं की एकीकडे याचा ठणाणा सुरु होतो... परत प्ले करा... दिवसभर जेव्हाही हुक्की येईल तेव्हा हा खेळ सुरु होतो, त्यात दुसरं गाणं लागलेलं चालत नाही, बंद केलेलं तर नाहीच नाही.. मध्ये मध्ये कुणी बोललेलं चालत नाही, तो ऐकतांना आपणही कंपनी दिलीच पाहीजे - तसे एक्स्प्रेशन्स दिलेच पाहीजे... जो कुणी या गाण्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातात सापडला त्याची तासभर तरी सुटका होत ना...

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपू...

Business Motivation Speakers are...

बिजनेस मॉडल, स्ट्रॅटेजीज्, Constitution या गोष्टी कधीच कॉपी करु नये - फुकटचे सल्ले वापरून तर नाहीच नाही. कारण प्रत्येक व्यवसाय, तो चालवणाऱ्याला माणसाचं गोल, स्वभाव, अडथळे, आयडीयाज् वेगवेगळ्या असतात... सणक वेगळी असते... मी तर म्हणतो लोगो, टॅगलाईन, प्रोफाईल्स आणि घटना ही पुर्णपणे स्वतःच्या हाताने लिहावी.... थोडे एक्स्ट्रा लागतील - पण काम म्हणजे काम होईल ! तर आणि तरच कुठल्याही संकटात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचं बळ मिळतं... आपण किती पाण्यात आहे, आणि स्टाफ पाण्यात उतरतोय की कपडे सांभाळतोय, वेळप्रसंगी हातातली अदृष्य दोरी ओढून स्टाफला पाण्यात ओढण्याची आपल्यात धमक आहे की नाही हे सगळं कळतं...! जन्माला घालतो तोच संकटात रक्षण करतो... आपण व्यवसाय उभा केलाय तर तो आपल्यालाच मजबूत करावा लागतो... ... हजारो रुपये घेवून मोटीवेशनल लेक्चर्स ठोकणाऱ्यांच्या नादी लागू नका... ढिगानं रोज जन्माला येतात - जातात... कुठलातरी नितीवाला गेले दहा दिवस फोन करून मागे लागला होता, "व्यवसायिकांसाठी कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानं" यावर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या म्हणून... फि : ३९९९९ फक्त ! प...

Police : Are they devils?

पोलीसांनी स्वयंसेवक म्हणून काही पोरं पांढऱ्‍या टिशर्टमध्ये उभी केलीय... त्या पोरांची पोलीसांच्या वर ताण आहे... आत्ता साठ-पासष्ठीतला एक माणूस स्कूटीवरुन जात होता, गाडीवर किराणा सामान. या टोळभैरवांनी अडवलं...  - कुठे निघालास ? त्यांच्या वडीलांच्या वयाच्या माणसाला अरे-तुरे करत विचारलं... त्यांनी किराणा सामान दाखवलं... तोपर्यँत चौघं घोळका करुन उभे राहीले. टोळक्याने लायसन्स मागितलं, लायसन्स घरी विसरल्याचं ऐकताच एकाने चारचौघात त्याची शिव्यांसह अक्कल काढली, एकाने पाठीत काठी घातली, एकाने काठीने गाडीवरची पिशवी उडवून लावली... साखर, तांदूळ सगळं अस्ताव्यस्त झालं... एक पावती फाडायला उभा... त्या टोळक्याच्या चार क्षणांच्या आनंदासाठी एका क्षणात त्या माणसाच्या आठवड्याच्या बजेटची माती झाली... ! . लॉकडाऊनच्या पहील्या टप्प्यात सामाजिक संवेदनशीलतेच्या जाणीवेतून, उन्हातान्हात उभे राहतात, हायरिस्क फ्रंटला सिक्यूरिटी देतात म्हणून मी पोलीसांना पाण्याच्या बॉटल्स, फूड पॅकेटस्, विटॅमीन सी टॅबलेटस वगैरे दिलेले... पण नंतर त्यांच्या असंवेदनशील वागणूकीचे एक एक किस्से समोर आले तर त्या...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved