Posts

Showing posts from March, 2016

April Fool Day

Image
प्रत्येकामध्ये दडलेल्या निरागस, बालीश आणि अवखळ मुर्खपणाला, बावळटपणाला आणि वेडेपणाला Happy April Fool Day मज्जा करा.. वेडेपणा बिनधास्त जगा... मस्ती करा... मारामारी करा... मनसोक्त ओरडा... भर रस्त्यात ठूमके लावत नाचा... सगळा sophisticated ness झुगारून वेडे व्हा... जे वाटेल ते ते करा... आपलंच खरं करा... भांडण झालं तर पेनच्या रिफीलची निप तोडून त्या माणसाच्या शर्टवर मागून फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करा... . आपल्यातला "वेडा" बाहेर काढायचा हाच एक दिवस मिळतो. वापरून घ्या. आज मुर्खांचा / मुर्ख बनवण्याचा दिवस... वेडयात काढा, पण... बिल स्वस्तात फाडा...

Chitale

Image
शून्य ते शंभर कोटी असा मोठ्ठा प्रवास करणारे भाऊसाहेब रघुनाथराव चितळे यांचं काल निधन झालं. . चितळ्याचं दुध, दही, तूप, श्रीखंड आणि बाकरवडी यांना रघुनाथरावांच्या हातची चव होती. काळ बदलला, पुणं बदललं तरी चितळ्यांची चव मात्र तश्शीच आहे. . जिथं आपल्यासारख्या सामान्य माणसांची जीभ चितळ्यांच्या चवीची गुलाम आहे, तिथं देवाला हा मोह आवरणं अशक्यच ! म्हणूनच "चितळे मिठाईवाले" ची शाखा स्वर्गात उघडण्यासाठी दस्तुरखूद्द रघुनाथरावांना निमंत्रण आलं, आणि त्यांनी ते स्विकारलं. . द्रष्टा उद्योजक आपल्यातून गेला हीच खरी खंत... भाऊसाहेब चितळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Suresh Bhat

Image
मराठी भाषेत गझल हा प्रकार ज्यांनी आणला, एकापेक्षा एक दर्दभरे, गझला ज्यांनी दिल्या त्या कविवर्य सुरेश भट यांची आज पुण्यतिथी... (निधन : १४ मार्च २००३) . "केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली", "तरुण आहे रात्र अजून", चांदण्यात फिरतांना..., मल्मली तारुण्य माझे, सारखं प्रणयगीत, प्रेमगीत,... उषःकाल होता होता, इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,  सारखं गंभीरगीत, आज गोकूळात रंग खेळतो हरी सारखी दर्जेदार गीतं सुरेश भटांची बाळं आहेत. . लहानपणी पोलीअो झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला होता... त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. . साधेपणात सुंदरता शोधणारा कवी... त्यांच्या कवीता - गझला आपल्याला समृध्द करतात. Thank You so much सुरेशजी... तुम्ही खुप दिलंय... भटांची एक आद्वितीय रचना... "आसवांनो माझिया डोळ्यातूनी वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका... हासते आयुष्य माझे, पाहुनी माझी व्य

RSS NEW UNIFORM

Image
जेव्हा अर्धी चड्डी होती तेव्हाही अभिमान होता... आताही आहेच... हे नाविन्य स्विकारण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. . फुरोगामी अर्ध्या चड्डीचे म्हणून डिचवायचे तेव्हा वास्तविक त्यांच्यातला मत्सर आणि असूया बाहेर पडायची. कारण इतका आकर्षक गणवेश इच्छा असूनही त्यांना घालता येत नव्हता. आता तर ते पण गेलं... डिचवण्याची एक संधी संपली. (अर्थात तेव्हा आम्ही डिचवले जात नसू, कारण संघाचा गणवेश घालता येणं भाग्याचं लक्षण आहे) . संघ काळानूसार बदलतो. . खुलासा नवीन गणवेशात पॅन्टचा रंग "ब्राऊन - तपकीरी" झालाय. काळा किंवा निळा ऐकीवात नाही.

महाभारत

Image
महाभारत कर्ण : अर्जुना... युध्दात माझ्या रथाचं चाक निखळलंय, धर्मानूसार तू घटीकभर युद्ध थांबवून मला रथावर चढू दे... . कृष्ण : अर्जुना... शत्रुचा वध करायची संधी सोडू नको... महारथी कर्णाचा वध करण्याची हीच योग्य वेळ आहे... . आणि अर्जुनाने बाण सोडून कर्णाचा वध केला.. . महाभारतातल्या काळया क्षणांपैकी एक क्षण... कपट करा पण जिंका...

MNS

Image
तो माणूस २४ तास पोलीस प्रोटेक्शन मध्ये राहतो, एसीमध्ये बसून, मर्सिडीजमध्ये फिरून... तुम्हाला गरीबांच्या रिक्षा - त्यांचा रोजगार - त्यांच्या मुलाबाळांचं पोट "जाळायला" सांगतो... . त्या गरीबांचे तळतटात तुम्हाला लागतील... त्यांचं अन्न हिरावल्याचं पाप तुम्हाला लागेल... तो तळतळाट तुम्ही आणि तुमची मुलंबाळं भोगतील... तुमच्यावर केसेस पडतील पोलीस मारतील... त्याच्या दहा पिढ्यांचं कल्याण करायला, तुमच्या दहा पिढ्या खपतील... . आणि पेट्या पोहचल्या, चेहरा झळकला की तोच माणूस, ''झालं गेलं गंगेला मिळालं" म्हणून त्यांचेच पाय धरायला जाईल... त्याला तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही... तो तुम्हाला सोडवायलाही येणार नाही... तुमच्या जीवावर तो आरामात सुखात राजेशाही जीवन जगेल.... आणि तुम्ही आयुष्यभर त्या रिक्षावाल्यांचे, त्यांच्या मुलाबाळांचे तळतळाट भोगत, कोर्टाच्या तारखा पाळत... पोलीसांचा - दैवाचा मार खात सडत रहाल... . आधी आदर असलेल्या त्याच्याविषयी आता फक्त किळस आहे... कारण मी निर्दयी नाहीय... इतरांच्या पोटावर लाथ मारणाऱ्यांचं समर्थन-आदर होऊच शकत नाही. #ShameOnYou

मनसेचा वर्धापनदिन आणि दशकपूर्ती

Image
= मनसेचा वर्धापनदिन आणि दशकपूर्ती = दहा वर्षांचं प्रामाणिक विष्लेषण चांगली बाजू १. पहिल्याच निवडणूकीत १३ आमदार निवडून आले. आणि राज ठाकरे या माणसाचा करीश्मा दिसला. पहिल्या चार वर्षात मराठीचा मुद्दा जोरदार चालला. उत्तर भारतीयांची गर्दी कमी झाली. काही प्रमाणात कां होईना पण मराठी टक्का वाढला. २. राज ठाकरेंचा अंश असलेले नितीन सरदेसाई, शिरीष पारकर, अनिल शिदोरे यांच्यासारखे अभ्यासू नेते मिळाले. ३. विकासाचं मॉडेल आणलं. नाशिकमध्ये अंमलबजावणी देखील झाली. ४. एरव्ही सेनेत लहान पदावर काम करून शिवसेनेतून बाहेर पडल्यावरच राज ठाकरेंना झळाळी मिळाली. त्यांच्यातल्या अभ्यासू नेता समोर आला. मुख्य म्हणजे मनसेच्या रूपाने शिवसेनेला पर्याय मिळाला. मुख्य म्हणजे राज ठाकरेंमुळे उध्दव ठाकरेंच्या आणि मनसेमुळे शिवसेनेच्या मर्यादा समोर आल्या. ५. बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र दिन, रेल्वे भरती, मराठी भाषा आदि मुद्यांवर राज ठाकरे आणि मनसेने जीव तोडून साथ दिली. त्यावेळी मनसे खरी मर्दांची हेच समोर आलं. खासकरून बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देतेवेळी. ६. टोलचा महत्वाचा मुद्दा मार्गी लागला. ७. सेनेच्या तुलनेत मनसे

महिला दिन

महिलांचा खरंच सन्मान व्हावा असं वाटत असेल तर दोनच गोष्टी करुया... एक - त्यांच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघणं बंद करू... कामूक नजरेने ती किती सेक्सी दिसते, तिची फिगर, वक्षस्थळ, चेहरा वगैरे बघून मुठा वाळण्यापेक्षा, तिला छेडण्यापेक्षा, छिछोरागिरी करण्यापेक्षा तीच्या गुणांची कदर करून, तिला आदर आणि सन्मान देवू... आणि दोन - भांडणात एकमेकांना शिव्या देतांना आईची x, बहिणीची x न काढता, त्यांना येताजाता न xवताच भलेही फ्रिस्टाईल पण जे असेल ते आपापसातच आवरू... स्त्री दुर्गेचं रुप आहे. तिची पूजा भलेही करत असाल पण मंदिराबाहेर तिच्याच स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या, तिच्याच योनीमार्गाचा उद्धार करणाऱ्यांवर ती प्रहार करतेच... . इतकंच केलंत तरी स्त्रियांचा खरा सन्मान होईल... . बाकी महिला सबळ आहेतच. दुर्गेचा अंश असलेल्या आणि आपल्याला जन्माला घालणाऱ्यांचं रक्षण आपण काय करणार...? सर्व स्त्रीयांना महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्यामुळे आमचं अस्तित्व आहे...

"रात्रीस खेळ चाले"

"रात्रीस खेळ चाले" वर बंदी आणा अशी तद्दन चुतीया मागणी होतेय... काय तर... यामुळे लोकं घाबरतील आणि कोकणाच्या पर्यटनावर परीणाम होईल... . कोकणातले लोकं हुषार असतात... शूर असतात.... असं ऐकलं होतं...समंथ - डाकिणी वगैरे भूतांना टरकून अश्या वायझेड मागण्या करणाऱ्यांची हुषारी आणि बहादूरी कुठे गेलीय... आणि मालिका बघून भितीनं दिड फूट लागणारी ही मंडळी अंधश्रध्देचं तुणतुणं वाजवणारे हॉरर फिल्म, आपबिती, फिअर फाईल्स वगैरेच्या वेळी कुठल्या बिळात लपलेली असतात... अंधश्रध्दा म्हणून मालिकाच बंद करा ही मागणी करणारे मुर्ख आहेत. आणि अंधश्रध्देची खाज असेल तर आधी ते बाबा बंगाली, बापू, मनोज कुमारचा फोटो असलेलं कसलंस यंत्राच्या जाहिराती हे बंद करा... . पर्यटन व्यावसायिक दृष्टीनं जरी पाहिलं तरी मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार अगदी काश्मिर बदनाम आहेत. तिथे आतंकी हल्ले, गुन्हेगारी आहे. रोज बातम्या येतात. चित्रपटात दिसतं. पण म्हणून काय तिथलं पर्यटन कमी झालंय कां ? . कायतरी फालतूपणा तिच्याआयला... मालिका पटत नसेल तर टिही बंद करा... बेवडयाच्या तंद्रीत बोलू नका...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved