महिला दिन

महिलांचा खरंच सन्मान व्हावा असं वाटत असेल तर दोनच गोष्टी करुया...
एक - त्यांच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघणं बंद करू... कामूक नजरेने ती किती सेक्सी दिसते, तिची फिगर, वक्षस्थळ, चेहरा वगैरे बघून मुठा वाळण्यापेक्षा, तिला छेडण्यापेक्षा, छिछोरागिरी करण्यापेक्षा तीच्या गुणांची कदर करून, तिला आदर आणि सन्मान देवू...
आणि
दोन - भांडणात एकमेकांना शिव्या देतांना आईची x, बहिणीची x न काढता, त्यांना येताजाता न xवताच भलेही फ्रिस्टाईल पण जे असेल ते आपापसातच आवरू... स्त्री दुर्गेचं रुप आहे. तिची पूजा भलेही करत असाल पण मंदिराबाहेर तिच्याच स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या, तिच्याच योनीमार्गाचा उद्धार करणाऱ्यांवर ती प्रहार करतेच...
.
इतकंच केलंत तरी स्त्रियांचा खरा सन्मान होईल...
.
बाकी महिला सबळ आहेतच. दुर्गेचा अंश असलेल्या आणि आपल्याला जन्माला घालणाऱ्यांचं रक्षण आपण काय करणार...?
सर्व स्त्रीयांना महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमच्यामुळे आमचं अस्तित्व आहे...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved