MNS

तो माणूस २४ तास पोलीस प्रोटेक्शन मध्ये राहतो,
एसीमध्ये बसून, मर्सिडीजमध्ये फिरून...
तुम्हाला गरीबांच्या रिक्षा - त्यांचा रोजगार - त्यांच्या मुलाबाळांचं पोट "जाळायला" सांगतो...
.
त्या गरीबांचे तळतटात तुम्हाला लागतील...
त्यांचं अन्न हिरावल्याचं पाप तुम्हाला लागेल...
तो तळतळाट तुम्ही आणि तुमची मुलंबाळं भोगतील...
तुमच्यावर केसेस पडतील
पोलीस मारतील...
त्याच्या दहा पिढ्यांचं कल्याण करायला, तुमच्या दहा पिढ्या खपतील...
.
आणि पेट्या पोहचल्या, चेहरा झळकला की तोच माणूस, ''झालं गेलं गंगेला मिळालं" म्हणून त्यांचेच पाय धरायला जाईल...
त्याला तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही...
तो तुम्हाला सोडवायलाही येणार नाही...
तुमच्या जीवावर तो आरामात सुखात राजेशाही जीवन जगेल....
आणि तुम्ही आयुष्यभर त्या रिक्षावाल्यांचे, त्यांच्या मुलाबाळांचे तळतळाट भोगत,
कोर्टाच्या तारखा पाळत...
पोलीसांचा - दैवाचा मार खात
सडत रहाल...
.
आधी आदर असलेल्या त्याच्याविषयी आता फक्त किळस आहे... कारण मी निर्दयी नाहीय... इतरांच्या पोटावर लाथ मारणाऱ्यांचं समर्थन-आदर होऊच शकत नाही.
#ShameOnYou

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved