मनसेचा वर्धापनदिन आणि दशकपूर्ती

= मनसेचा वर्धापनदिन आणि दशकपूर्ती =
दहा वर्षांचं प्रामाणिक विष्लेषण
चांगली बाजू
१. पहिल्याच निवडणूकीत १३ आमदार निवडून आले. आणि राज ठाकरे या माणसाचा करीश्मा दिसला. पहिल्या चार वर्षात मराठीचा मुद्दा जोरदार चालला. उत्तर भारतीयांची गर्दी कमी झाली. काही प्रमाणात कां होईना पण मराठी टक्का वाढला.
२. राज ठाकरेंचा अंश असलेले नितीन सरदेसाई, शिरीष पारकर, अनिल शिदोरे यांच्यासारखे अभ्यासू नेते मिळाले.
३. विकासाचं मॉडेल आणलं. नाशिकमध्ये अंमलबजावणी देखील झाली.
४. एरव्ही सेनेत लहान पदावर काम करून शिवसेनेतून बाहेर पडल्यावरच राज ठाकरेंना झळाळी मिळाली. त्यांच्यातल्या अभ्यासू नेता समोर आला. मुख्य म्हणजे मनसेच्या रूपाने शिवसेनेला पर्याय मिळाला. मुख्य म्हणजे राज ठाकरेंमुळे उध्दव ठाकरेंच्या आणि मनसेमुळे शिवसेनेच्या मर्यादा समोर आल्या.
५. बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र दिन, रेल्वे भरती, मराठी भाषा आदि मुद्यांवर राज ठाकरे आणि मनसेने जीव तोडून साथ दिली. त्यावेळी मनसे खरी मर्दांची हेच समोर आलं. खासकरून बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देतेवेळी.
६. टोलचा महत्वाचा मुद्दा मार्गी लागला.
७. सेनेच्या तुलनेत मनसेचा बऱ्यापैकी सुसंस्कृत चेहरा आहे.
८. भाजपालाही मनसे फॅक्टरचा विचार करावा लागतो, हिंदी चॅनेल्समध्ये मनसेचा दरारा आहे. हे मनसेचं- खूप मोठं यश आहे.
.
नकारात्मक बाजू
१. संघटन जमले नाही. १० वर्षात मनसे तळागाळात पोहचू शकली नाही. नाशिक आणि मुंबईत काही ठिकाणं सोडली तर मनसेचा जम बसला नाहीय. स्था. स्व. संस्थांमध्ये मनसे अजूनही शून्य आहे.
२. राज ठाकरेंचा एकछत्री अंमल नडला. आणि बरेच कार्यकर्ते दुखावले जावून स्वगृही परतले. याचमुळे १३ वरून १ आमदार अशी उलटी पण निर्णायक पावलं पडली.
३. प्रश्न हाताळणं जमलं नाही. उ. भा. वाद, टोलप्रश्न इ. वेळी ऐन भरात मनसे उलट्या पावली परतली. तोच मुद्दा मोदींना समर्थन देण्यावेळी झाला. आपलं ध्येय, मार्ग याबद्दल मनसे आणि राज ठाकरे अजूनही गोंधळलेले दिसतात.
४. अनेक विवादांना तोंड देणं जमलं नाही. त्यामुळे १०० चुकांचे परीणाम भोगावे लागले. बऱ्याचदा तर सपशेल शरणागती पत्करावी लागली.
५. सगळ्यांत महत्वाचं : हिंदुत्ववादी पक्षातून बाहेर पडल्यावर राज ठाकरेंची अहिंदूत्ववादी भूमिका लोकांना पटली नाही.
.
मनसे शिवसेनेला पर्याय आहे. पण विश्वासार्हता मिळवली नाही. समर्थक आहेत पण संघटन नाही. तरीही इतर कुणासोबतही न जाता, मनसे स्वतः प्रबळ व्हावी, किमान एकदा बहूमतात सत्ताधीश व्हावी आणि ब्ल्यूप्रिंट अंमलात आणावी... याच शुभेच्छा.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved