"रात्रीस खेळ चाले"

"रात्रीस खेळ चाले" वर बंदी आणा अशी तद्दन चुतीया मागणी होतेय... काय तर... यामुळे लोकं घाबरतील आणि कोकणाच्या पर्यटनावर परीणाम होईल...
.
कोकणातले लोकं हुषार असतात... शूर असतात.... असं ऐकलं होतं...समंथ - डाकिणी वगैरे भूतांना टरकून अश्या वायझेड मागण्या करणाऱ्यांची हुषारी आणि बहादूरी कुठे गेलीय...
आणि मालिका बघून भितीनं दिड फूट लागणारी ही मंडळी अंधश्रध्देचं तुणतुणं वाजवणारे हॉरर फिल्म, आपबिती, फिअर फाईल्स वगैरेच्या वेळी कुठल्या बिळात लपलेली असतात...
अंधश्रध्दा म्हणून मालिकाच बंद करा ही मागणी करणारे मुर्ख आहेत. आणि अंधश्रध्देची खाज असेल तर आधी ते बाबा बंगाली, बापू, मनोज कुमारचा फोटो असलेलं कसलंस यंत्राच्या जाहिराती हे बंद करा...
.
पर्यटन व्यावसायिक दृष्टीनं जरी पाहिलं तरी मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार अगदी काश्मिर बदनाम आहेत. तिथे आतंकी हल्ले, गुन्हेगारी आहे. रोज बातम्या येतात. चित्रपटात दिसतं. पण म्हणून काय तिथलं पर्यटन कमी झालंय कां ?
.
कायतरी फालतूपणा तिच्याआयला... मालिका पटत नसेल तर टिही बंद करा... बेवडयाच्या तंद्रीत बोलू नका...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved