गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं...
= गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं... =
निर्णय योग्य - स्वागतार्ह - नो डाऊट !
पण - खरं सांगतो..
घाई झाली,
दैनंदिन व्यवहार बारगळल्याने व्यावसायिक, वैयक्तीक नुकसान झालं...
पैसा असूनही ठाणठाण झाली...
नोटांसाठी जवळपास पूर्ण दिवस गेला...
ज्याचा काळा पैसा या उक्तीशी काडीचाही संबंध नाही तो माणूस मात्र नाहक पैशाने आणि वेळेने भरडला जातोय, हाल होताय हे ही तितकंच खरंय !
.
दैनंदिन व्यवहाराला पैसा लागतो त्यामुळे करन्सी नोट रिप्लेस करणं तितकंच महत्वाचं आहे... नंतर करता येईल या कॅटॅगिरीत नाहीय हा कार्यक्रम ! लगेच व्हायलाच हवं असं आहे !
.
निर्णय स्वागतार्ह आहे, त्यासाठी हाल सोसणंही क्रमप्राप्त आहेच... पण एका मर्यादेबाहेर नको... ! प्रत्येक गोष्टीला दुसरी नकारात्मक बाजू असतेच, आणि ती खुल्या दिलाने मान्य करायलाच हवी... सरकारच्या या निर्णयाला सुद्धा तशी दुसरी बाजू आहे... टक्केवारीने नोटा विकल्या जाताय, अडाणी-अशिक्षित ठगवले जाताय, सामान्य लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, खाद्यपदार्थ - पेट्रोल सारख्या गोष्टींचा तुटवडा आलाय, बाहेरगावी असणाऱ्या लोकांचे खूप हाल होताय-होणारेत ! जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालंय ! आजारी माणसं असतील तर किमान आठ दिवस फक्त हतबलता हाती आहे. !
.
त्यात सामान्य लोकांना आणि या यंत्रणेतल्या लोकांनाही, बँकेतल्या वगैरे नक्की काय होतंय, काय करायचंय, फॉर्म भरायचाय की नाही, किती पैसे द्यायचे या गोष्टींची पुरेसी माहिती नाही... मनमानी, गोंधळ, गैरसोय सुरुय... नियोजन केलं,
पण ते शेवटचा सामान्य माणूस लक्षात ठेऊन नव्हतं, परीपूर्ण नाहीय, त्यामुळे जवळपास वाईटरित्या ढासळलंय... !
.
गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं... तसं
५ कोटी भ्रष्टाचाऱ्यांच्या काळ्या पैश्यांंच्या पापाची फळं, उरलेले १२० कोटी भारतीय तीन दिवसांपासून नाहक भोगताय... हे नाकारून चालणार नाही !
- तेजस कुळकर्णी