रागचर्चा

शास्त्रीय गायक / गायिका म्हणवून घेण्याचा नक्की निकष काय? शास्त्रीय संगीताच्या  मैफिलीत श्रोता नक्की काय ऐकायला जातो ! किंबहुना त्याने काय ऐकायला जाणे अपेक्षित आहे ? रागगायन / ख्यालगायन, टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत, कजरी ... ?
म्हणजे बघा आपण जेवायला जातो तेव्हा भारतीय जेवणाच्या ताटात Main Course म्हणजेच पोळी, भाजी, आमटी, भात -  या गोष्टी भरपूर (पोटभर) आणि चविष्ट मिळणं, खाणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग जर उत्तम desert मिळालं तर चंगळच ! पण desert हा काही main course नाही आणि तो पोटभर खाता येत नाही आणि खायला आपण गेलेलोही नसतो. तेव्हा तो किती खाणार ?
तसच हल्ली शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत होत. शास्त्रीय संगीत मैफल म्हंटल कि ख्यालगायन हा main course अपेक्षित आहे. त्यात रागमांडणी, रागशुद्धता, सूर, लय, रागोच्चार  अशा अनेक गोष्टींची अपेक्षा असते. पण हे सगळं ना सांभाळता एक उपचार म्हणून नाममात्र ख्याल गायचा. म्हणजे समोर डोळ्याला पोहे दिसतायेत म्हणून त्याला पोहे म्हणायचे इतकच. पोहे, मीठ, मिरच्या, कडीपत्ता, साखर सगळं आहे. पण त्याच प्रमाण धन्यवाद !! पण मग पोह्यानंतर दिलेलं सरबत फारच कमाल चविष्ट आहे. पण सरबतावर पोट कस भराव. आणि मुळात मी पोहे खायला गेलोय तर सरबतावर पोट का म्हणून भरू ?
मी ख्याल ऐकायला आल्ये तर मग मी नाट्यसंगीत, ठुमरी, टप्पा, कजरी ऐकून माझं पोट भरणार आहे का?
माझं संस्कृत भाषेतील विवेचन लोक ऐकायला आल्येत. पण, मी धड संस्कृत बोलत नाहीये. पण, नंतर प्राकृत, अर्धमागती मी छान बोलते. त्यावर माझं प्रभुत्व आहे. मग मी संस्कृत पंडित कशी? मग तसच मी ख्याल गायक / गायिका का? मी टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत / गायक / गायिका म्हणणे उचित ठरेल.
शास्त्रीय संगीतात एखाद्याच्या ख्यालगायनाची पार बोंब आहे पण तो गायक, टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत उत्तम गातोय. मग तो नक्की शास्त्रीय संगीत गायक आहे का ! काही कळेनासं झालय.   Let me clear, it's not a crime presenting semiclassical in a classical concert but you should be able to spellbound the connoisures by your khayal rendering only..  Semi classical should be the cherry on the top.
एखाद्या रागच नाव ते जाहीर केल्यावर गायन सुरु केलं कि ते रागचित्र दिसेल अशी श्रोत्यांची अपेक्षा. पण आजकाल श्रोत्यांकडून फारच समजूतदारपणा दाखवला जातो. म्हणजे जस लहान मूल सांगतो कि मोराच चित्र काढतो आणि ते चित्र बदकासारखं दिसत. पण, आपण त्याला वा वा काय छान मोर काढलाय म्हणतो तस ! राग, यमन, छायानट, जयजयवंती जो काही जाहीर केलाय तोच राग दिसू दे हि basic requirement नाही का ! नाही तर मग रागसंगीत का म्हणायचं ?
दुसरं असं कि मुळात श्रोत्यांची पण पंचाईत अशी कि त्यांना authentic पुरणपोळीची चवच माहित नाही. मग समोर आलेला गोडसर, गोलसर पदार्थ आहे त्याला  ते पुरणपोळी म्हणून खातात तस झालय. म्हणजे श्रोते, आयोजक सगळ्यांची फसवणूक आणि मुळात आपण फसवले गेलोय हे पण त्या पामरांना कळत नाही.
काही मोजके कसदार कलाकार याला नककी अपवाद आहेत.. ही जमेची बाजू आहे.
खरंच काही कळेनासं झालय.
......
>>पण हे सगळं ना सांभाळता एक उपचार म्हणून नाममात्र ख्याल गायचा.<<
चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखं एकदा कसाबसा तो पहिला ख्याल संपवतात.. आणि मग त्या भांडवलावर पुन्हा ख्यालगायक म्हणवून घ्यायला मोकळे होतात. हा हा :)
ख्यालाचा आत्मा कळावा लागतो. ख्यालातील गायकी कुठे आहे, तिचा शोध कसा घ्यायचा हे कळावं लागतं. नुसते कान, नाक, हात, पाय जोडून शरीर तयार होत नाही. त्यात आत्माही असावा लागतो..
पण वास्तविक असं चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखा जी मंडळी ख्याल गातात त्यांचा दोष नाही. कारण वर म्हटल्याप्रमाणे ख्यालाचा आत्मा, त्यातील गायकी या सगळ्याकरता तुमचं मन जेवढं संवेदनशील हवं, तेवढीच तुमच्या बुद्धीचीही झेप हवी. पण ती नसल्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवळ एक उपचार म्हणून नाममात्र ख्याल गायला जातो.. कसदार गायकी, घराणेदार गायकी या गोष्टी तर फारच पुढच्या आहेत..
>>Semi classical should be the cherry on the top.<<
किंवा मग अशा मंडळींनी केवळ सेमी क्लासिकलच्याच मैफली कराव्यात. त्यात काहीच गैर नाही..
>>पण आजकाल श्रोत्यांकडून फारच समजूतदारपणा दाखवला जातो. <<
"श्रीते छान फ्रेश होते, माझ्या गाण्याला आले होते, आणि ते छान फ्रेश होते म्हणून त्यांना माझं गाणं आवडलं, असाही एक वर्ग असतो श्रोत्यांचा" असं कुमार गंधर्व म्हणायचे.. :)
अशा श्रोत्यांकडून फक्त समजूतदारपणाच दाखवणं शक्य असतं. मूळ गाणं काय आहे, ख्यालगायकी कशाला म्हणतात हे माहीत नसलं की फक्त समजूतदारपणाच दाखवावा लागतो.. हा हा :)
असो..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved