राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी
फेसबुकवर आणि अन्य समाजमाध्यमांत सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी याबाबत प्रश्न विचारणारी पुढील पोस्ट फिरत आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींना हा प्रश्न पडला असल्याने त्याचे उत्तर.
धन्यवाद.
(ता. क. - 'कशावरही विश्वास ठेवायचाच नाही' या वृत्तीच्या लोकांनी कमेंट वगैरे करून वेळ वाया घालवू नये)
धन्यवाद.
(ता. क. - 'कशावरही विश्वास ठेवायचाच नाही' या वृत्तीच्या लोकांनी कमेंट वगैरे करून वेळ वाया घालवू नये)
एक प्रश्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गुरुपौर्णिमेला संघध्वजासमोर गुरु दक्षिणा ठेवायची पद्धत आहे.
दहा रूपयांपासून दहा लाखांपर्यत कितीही रक्कम रोख स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून ठेवली जाते. देशभर कोट्यवधी जमणार्या या रकमेची कधीही पावती दिली जात नाही. त्यावर संघाने कधी करही भरलेला नाही.
दहा रूपयांपासून दहा लाखांपर्यत कितीही रक्कम रोख स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून ठेवली जाते. देशभर कोट्यवधी जमणार्या या रकमेची कधीही पावती दिली जात नाही. त्यावर संघाने कधी करही भरलेला नाही.
मग हे धन काळे म्हणायचे की, धवल?
या प्रश्नाचे उत्तर-
संघाच्या गुरुदक्षिणेत जमा झालेली सर्व रक्कम शाखेच्या बँक खात्यात जमा केली जाते. सर्व खर्च त्याच निधीतून केले जातात. या सर्व खर्चाचा सर्व तपशील व्यवस्थित ठेवला जातो.
बँक अकाऊंट स्टेटमेंट्स असतात. वेळोवेळी सर्व खर्चाचे ऑडिट होत असते.
संघाच्या नित्य कामाच्या खर्चासाठी गुरुदक्षिणेव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी घेतला जात नाही.
मोठया कार्यक्रम खर्चाचे स्वतंत्र ऑडिट करून घेतले जाते.
संघ शासनाकडून आर्थिक मदत किंवा सवलत घेत नसल्यामुळे असा खर्च स्वतंत्रपणे देण्याचे बंधन नाही. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आजपर्यंत तरी आवश्यक नाही. तरीही बँक खात्यांच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार होत असल्याने कोणतेही सरकार आवश्यकतेनुसार कधीही सर्व व्यवहार तपासू शकते.
अधिक माहितीसाठी खालील खटला अभ्यासावा -
Commissioner Of Income-Tax vs Rastriya Swayam Sevak Sangh on 22 February, 1994
Commissioner Of Income-Tax vs Rastriya Swayam Sevak Sangh on 22 February, 1994