Madhujal

मधुजाल
दोन मोठ्या नोटा बंद करून खेळ सुरू झाला. बदलून देतांना त्यांच्या समप्रमाणात नवीन चलन आले.
१.सर्व खाती पॅनकार्ड, आधारने जोडली आहेत अन् डिपाॅझिट फक्त अडीच लाख रोज भरता येतील. म्हणजे पन्नास दिवसात फार तर फार सव्वा कोट रूपये भरता येतील (ते ही कोणतीही चौकशी न झाल्यास, नशीबावर हवाला) आली का पंचाईत?
२. कदाचित् काही दिवसात बँका रोख भरणा बंद करतील कारण कर्जाचे अन् ठेवींचे प्रमाण व्यस्त होत जाईल अन् मग सरकार 'मुद्रा योजने'त का कर्जवाटप केले नाही? ह्याचे कारण मागणार! मुद्राची प्रकरणे निकालात न काढता ती कुजवली बँकांनी. आली का पंचाईत?
३. कॅश कोणीही व्यवहारात स्विकारत नाहीये. त्या नोटा बदलून घ्याव्या लागतील, घोषणापत्र भरून. आली का पंचाईत?
४. एखाद्या चालू खात्यासमोर 'हातची रोकड' पाहता त्यालाही भरण्याची बंधने आहेत. ती कोणी व्यावसायिकाच्या वतीने भरली तर व्यावसायिकाला 'रोख हाती ठेवून व्याज का भरत होतात?' सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. आली का पंचाईत?
५. ज्या पतसंस्था ठेवी घेत जातायेत त्या जर कचाट्यात सापडल्या तर तोंड दाबून बुक्क्याचा मार. कोण सांगेल माझा काळा पैसा त्या पतसंस्थेत होता? आली का पंचाईत?
६. हे पैसे कोणा देवळात टाकता येतील म्हणजे कोणाला लुबाडून, गैरव्यवहारातून मिळवलेले पैसे 'तत्सत ब्रह्मार्पणमस्तु।' करावे लागेल. सगळेच्या सगळे. आली का पंचाईत?
७. मग एकच उपाय उरतो, जमिनीत पुरावे लागतील, पाण्यात सोडावे लागतील, जाळून टाकावे लागतील. आली का पंचाईत?
------
'कुजलेल्या पैशाची कहाणी' ह्या लेखसंग्रहातून साभार..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved