पेन पुराण

जे काम तीन रुपयांच्या यूज अॅन्ड थ्रो पेननं होतं, त्यासाठी तीस रुपये खर्च करुन नव्वद टक्के नुकसान सहज करण्याची माझी कधीच इच्छा नसते... अॅनेक्स टू कॉलेज, मी बिनधास्त होलसेल अडीच रुपये कॉस्ट पडणारे यूज अॅन्ड थ्रो चे च पेन वापरतो... काळं-निळं-लाल-हिरवं ! तीन रुपयात तिच बोँब पडते, जी तीनशेच्या पार्करनं पडणारे... तसं माझं मराठी-इंग्रजीचं अक्षर वगैरे बरंय...! आणि ते पेन हरवलं तर हळहळ फार फार दहा मिनिटांची ! थोडक्यात गोडी.
.
पण पॉईँट वेगळाय, पोष्टीचा मुद्दा हा आहे... एक पेन - साधारण दहा-बारा ते पंधरा दिवस जातं, कधीकधी जास्त... ते सेट झालं, की आपलं त्याच्याशी नकळत छोटसं नातं तयार होतं, सवय होते... सहजता येते. आणि शेवटाकडे येता येता, ते आपलं होतं... त्याचा उत्तरार्ध आला की आपल्याही नकळत त्याची जपणूक सुरु होते... पण कुठल्यातरी क्षणी ऐन महत्वाच्या वेळी ते संपतंच... त्याचा शेवटचा क्षण येतो.!
.
"गुडबाय बडी, थॅंक यू...." ! त्या पेननं कुठलीतरी महत्वाची डिल फायनल केलेली असते, परीक्षा दिलेली असते, कुणालातरी पत्र लिहीलेलं असतं... महत्वाचा मजकूर लिहीलेला असतो... बरंच काही असतं... त्या आठवणी क्षणभर रेँगाळतात, एक कृतज्ञतापूर्वक नजर त्याच्याकडे टाकतो, आणि ते डस्टबीनला सोपवतो... तो क्षण - क्षणाचाही शंभरावा भाग कुठेतरी मनात बिछडने का गम वगैरे टाईपची हालचाल होतेच...
.
हे सगळं एका क्षणात नैसर्गिकरीत्या फास्ट घडतं... आज जरा लक्ष दिलं, एक एक गोष्ट स्लो मोशन मध्ये बघितली... !
इमोशनल बॉँडस भयंकर असतात, मग ते सजीव असो वा निर्जीव...
सजीव असतील तर
"स्मृती ठेवूनी जाती,
दोन दिसांची नाती..."
निर्जीव असतील तर
त्या वस्तूचं आयुष्य, वापर आणि किँमत यावर डिपेँड करतं !
.
#पेनपुराण - तेजस कुळकर्णी :-)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved