Posts

Showing posts from January, 2017

राव

"राव" ! पुण्यात जनरली वापरला जाणारा शब्द. जो जन्मानं पुणेकर असतो केवळ तोच सराईतपणे आणि सहजपणे याचा प्रयोग करू शकतो... आणि त्यानेच करावा... तो पण गरजेच्या ठिकाणी... बाहेरच्या लोकांसमोर वापरला नाही तरी कळतं ! ... बाकीच्यांचं कसं असतं ? पुणेरी मराठीला विशिष्ट स्टँडर्ड असतं. त्यामुळे बरीच मंडळी "आपण लै हुश्शार" दाखवण्यासाठी पुणेरी टोनची कॉपी करत असतात. एखाद दुसरं ध्यान पुण्यात दोन तीन दिवस राहून गेलं की किंवा पुण्यातल्या नातेवाईकाबरोबर फोनवर बोललं तरी आपली हुशारी राव राव करून दाखवतं.. म्हणजे ओढून ताणून... आज खूप थंडीय राव... मला बोअर होतंय राव... उ. ठा. ची काल कित्ती मस्त घेतली राव... वगैरे... .. ते कितीही बोललं तरी ओढून ताणून म्हणल्यासारखं वाटतं... आपण राव राव केलं तर लोकं आपल्याला पुण्याच्या गणतीत धरतात असा गोड गैरसमज करून...! ... मराठवाड्यात राहणारी एक मैत्रिण माझ्याशी बोलतांना हे राव राव लाऊन बोलत होती... तिची मैत्रिण पुण्यात राहून आलेली, ती तिच्याशी तसं बोलायची तर सवय झाली... वगैरे ! मराठवाडी टोन मूळातच गोड, त्यामुळे ओरीजीनल ऐकायची सवय असल्यानं असं...

साडेसाती आणि मी

Image
=साडेसाती आणि मी= .. आज संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी शनीमहाराज धनू राशीत जातील आणि तूळ रास... म्हणजे मी... फायनली साडेसातीतून सुटेल... साडेसात वर्षांचा बांबू फायनली निघेल... वयाच्या साडेसोळाव्यांत, साधारण २००९ च्या मध्यावधीत शनीमहाराजांची एंट्री झाली, तो साडेसातीचा फेरा फायनली आज सुटतोय... ... तेजा... तू हे सगळं मानतोस ? - तर हो.. नक्कीच मानतो... १०० टक्के ! ते कसं ? - जर हा साडेसात वर्षांचा काळ बघीतला तर मी सॉलीड भोसडला गेलोय... तगडे तडाखे बसलेय... आणि जितकी लायकी तितकंच मिळालंय... आणि पटतंय ! .. माझ्या हातून जे जे काही बरं वाईट घडलंय, ती प्रत्येक गोष्ट माझ्यावरच उलटलेली,  त्या प्रत्येक गोष्टीची आठवण झालेलं मी अनुभवलंय ! आयुष्याच्या इच अॅन्ड एव्हरी थिंगवर फोकस होतो... लक्ष जातं..... . अनुभवाचे बोल... साडेसाती नुकसान करते ? - - नाही.. पण, अपेक्षेच्या उलटं घडतं, लायकीतलं मिळतं हे खरं... साडेसाती भरभराट करते ? - - बिलकूल नाही... तेच, लायकीतलं मिळतं... थोडक्यात - साडेसाती आपल्याला आपली जागा, लायकी दाखवते ! ... हा पूर्ण काळ डायरीत आहे तो रिवाइंड केला तर एक ज...

हास्य बांधतोय (Tushar Kulkarni)

Image
= हास्य बांधतोय = . चार महिन्यांपूर्वी मी धुळे पंचायत समितीत सिव्हिल इंजिनियर पदावर रुजू झालो. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला, आयुष्याकडे बघण्याला वेगळा अर्थ मिळालाय.. लोकांचं स्वप्न त्यांच्या डोळ्यातून प्रत्यक्षात उभं राहतांना बघणं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे... आणि तो आनंद मला रोज अनुभवायला, त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न बघायला मिळतंय. . प्रधानमंत्री, इंदिरा आवास, शबरी इ. योजनांच्या खेडोपाडी लाभार्थ्याना शासकीय अनुदानित घरासाठी माध्यम देणे, घर बांधकामावर देखरेख करणे, अनुदानाची प्रक्रिया करणे या कामासाठी मी गावांमध्ये साईट व्हिजीटला जातो. आणि या व्हिजीटस् नी मला जगणं शिकवलंय ! .. तळागाळातल्या लोकांची परीस्थिती खुप वाईट असते. पडकी, कुडाची घरं, एकवेळ जेवायला मोहताज लोकं आहेत... असाच काल घरकुल कामासंबंधी एका गावात गेलो... नेहमी प्रमाणे संबंधीत गावातील सरपंच ग्रामसेवक शिपाई यांना मी येणार आहे हे सांगीतले... आमच्या साईट व्हिजीट सुरू झाल्या... त्या त्या लाभार्थ्याकडे गेल्यानंतर हातातलं काम सोडून साहेब आले म्हणत समोर आले... साहेब आले आहेत आता आपल्याला नवं घर मिळणार... आपल्या घराचं ...

पूर्वसंध्या

Image
माझं नवं वर्ष उद्यापासून सुरु होतंय... आयुष्याचं रौप्यमहोत्सवी वर्ष... सरतं वर्ष म्हणावं तितकं छान नव्हतं, शब्दशः वाईट होतं... आयुष्य ढवळलं गेलं, काही लोकं दुरावली... प्रचंड नुकसान झालं... पण त्या अनुभव, आठवणींच्या शिदोऱ्या बांधून भूतकाळात ठेवल्या.. आणि उद्यापासून नव्या ताकदीनं नवा प्रवास सुरू करणार... ... कटू क्षणांचे अनुभव झाले चांगल्या क्षणांची आठवण झाली... दुरावलेली लोकं मनाच्या कप्प्यात ठेवली... ... नवी डायरी... नवं प्लानर... ... मोठ्ठं टार्गेट आहे... लिस्ट आहे... माझी कंपनी १ कोटीच्या टर्न ओव्हर पर्यंत न्यायचीय... मुंबईत स्वतःचं घर, ऑफीस घ्यायचंय... एक नाटक करायचंय... यूएस ला जायचंय... ... ... ... वर्षाचा शेवट शांत होतोय...

संक्रांत : समज - गैरसमज

मकरसंक्रांती दिनाविषयी बरेच गैरसमज आहेत. (१) हा उत्तरायण आरंभदिन आहे- अजिबात नाही. सध्या उत्तरायण आरंभदिन २२ डिसेंबर आहे. (२) मकरसंक्रांती नेहमी १४ जानेवारीला येते- सध्या १४ जाने ला आहे. पण ती १५-१६ कडे पुढेपुढे जात रहाणार आहे. मात्र अतिशय मंद गतीने. जेव्हां ती १६ ला जाईल तेव्हां आपण कोणी जिवंत असणार नाही ते पहायला. काही झाले तरी मकरसंक्रांती आता मागे १३ जानेवारीकडे जाणार नाही. मकरसंक्रांती या सणाचा संबंध सूर्याचे राशीसंक्रमणाशी आहे. तिथींशी किंवा ईसवी सन दिनांकांशी नाही. सूर्य एका राशीतून दुसरे राशीत प्रवेश करतो, तो संक्रांतिदिन. अशा १२ राशींच्या १२ संक्रांती आहेत. पण महत्त्व मकरसंक्रांतीला आलेले आहे. कारण, सुमारे १७६८ वर्षांपूर्वी सूर्याचे उत्तरायण मकरसंक्रांतीला सुरू व्हायचे. आता ते २२ डिसेंबरला म्हणजे सूर्य धनु राशीत असतांना होत आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तरायण आरंभदिन साजरा करायचा असेल तर खरे तर धनुसंक्रांत साजरी करायला हवी, पण आपण अजूनही मकरसंक्रांतच साजरी करीत आहोत. हा निव्वळ वेडगळपणा आहे. इथे राशी हा शब्द निरयन राशी या अर्थाने वापरलेला आहे. आपली भारतीय, हिंदू परंपरा जास्त ...

शेवटची ७ मिनिटं...

शेवटची ७ मिनिटं... मृत्युनंतर माणसाच्या मेंदूत चालणाऱ्या घटनांवर एक चांगलं आर्टिकल वाचत होतो. अध्यात्मिक वगैरे नव्हतं. अगदी शुद्ध वैज्ञानिक होतं. बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे किंबहुना त्यांचा असा अभ्यास आहे की माणसाच्या मृत्युनंतर सात मिनिटं त्याचा मेंदू काम करत असतो. त्या सात मिनिटात मेंदू त्याचं सर्व आयुष्य रिवाईंड करून दाखवतो. स्वप्न पडावं तसा काहीसा प्रकार असतो हा. साधारणपणे स्वप्नं हि विअर्ड असतात. एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या घटना स्वप्नात दिसतात. मात्र ह्या शेवटच्या सात मिनिटात मेंदू काहीही विचित्र दाखवत नाही. जे काही घडलं ते तसंच्या तसं दाखवतो, अगदी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये! काय दाखवत असेल ना मेंदू माणसाला? प्रत्येकाचा वेगळा फ्लॅशबॅक, वेगळ्या घटना! कुणाचं सुखी लहानपण, कुणाचे कळकटलेले दिवस... कुणाची मुजोरी, कुणाची लाचारी... कुणी उत्कट केलेलं प्रेम, कुणी विनाकारण केलेला द्वेष... कुणाची पूर्ण झालेली स्वप्नं, कुणाच्या चुरगळून गेलेल्या आशा... कुणी गाठलेली उंची, कुणाच्या वाटेला कायमच आलेला खुजेपणा... कुणी पसरवलेला चांगलेपणाचा सुवास, कुणाच्या नजरेतला हलकटपणा......

ती सध्या काय करते ?

"ती सध्या काय करते ?" यावर झक मारी करत बसायला वेळ आणि इच्छा दोन्हीही नाही... कारण तशी कुणी "ती" कधीच नव्हती... ! दहावी पर्यंत बॉईज स्कूल, तोपर्यंत हे असलं काही असतं हे डोंबल पण माहीत नव्हतं.. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर बारावीचं ९०% चं टार्गेट, सीईटी या भानगडीत कुणी ती कडे बघायला वेळ नव्हता... पुढे एम वन टू एम थ्री विथ प्रोग्रॅमिंग च्या आकंठ प्रेमात बुडालो होतो, ... दिसायला वगैरे बरा असलो, तरीही माझ्या तुसड्या, फटकळ  स्वभावामूळे माझ्यावर क्रश असूनही बऱ्याच पोरींनी बोलायची हिम्मत केली नाही... असे मेसेजेस आत्ता मिळतात... बरं केलंत ! .. नंतर मला माझी "ती" भेटली... माझी कंपनी... ! तीच माझी जान वगैरे... जी आयुष्यभर सोबत असेल... स्वतःचा व्यवसाय, त्यामुळे सकाळ ते रात्र मी त्यातच असतो... मैत्रिणी, दिदी वगैरे पण "तेजा, तुला वेळ नसतो" ची पिंगाणी वाजवतात... मित्र बिचारे समजून घेतात, गप्प बसतात... बाकीच्यांची चिडचिड बरोबर असेलही - नसेलही.. ... पण, आता जी मुलगी येईल तीच आयुष्यभर राहील... ... याव्यतिरीक्त... दुसरी "ती" असती तरी, ...

इच्छेला मरण नसतं... :-P

Image
जुन्या अल्बममध्ये हा फोटो सापडला... २००७, साधारण ९ - १o वर्षांपूर्वीचा फोटो आहे. दिल्लीला लाल किल्ल्यावर गेलो होतो. मी, पप्पा आणि मम्मा पुढे चालत होतो, तुषारने कोडॅक कॅमेरात नकळत क्लिक केला... ... नेहरू कुर्ता, तेव्हापासूनच असलेली (शारीरीक) उंची आणि अगदीच गर्दी नसलेल्या लाल किल्ल्याकडे स्वतःला रुबाबात जातांना पाहून खूप छान वाटतंय... ... काही गोष्टी या नकळत भव्य होतात, छान होतात... हा फोटो त्यातलाच एक... या फोटोचे अर्थ जुळवायला खूप जूळतील... पण, तेव्हा जाणवलं नाही ते आत्ता जाणवलं... ... Don't mind... आत्ता एका क्षणासाठी मी स्वतःला "नमो" फिल केलं... :-P रुबाबात भाषण द्यायला जातोय वगैरे... :-D :-D :-D ... इच्छेला मरण नसतं... :-P ... (एकदा स्पेशल रिक्वेस्टवर, सेटींग लाऊन मुंबईच्या मंत्रालयात सीएमची केबीन, ती खुर्ची बघायला गेलो होतो. ते नव्हते तिथे... पण तेव्हा माझी त्या खुर्चीवर बसायची खूप मनापासून इच्छा झाली होती, मी स्वतःला तसं फिल पण केलं... पुर्ण किस्सा नंतर कधीतरी सांगेन....)... ... तुर्तास इतकंच !

Om Puri RIP

Image
ओम पुरी यांचं निधन ! . सलग दोन दिवस दोन सिनेमे एकाच अभिनेत्याचे पाहिले की पूर्णपणे वेगवेगळ्या भूमिका बघून आदर दुणावतो. सलग दोन दिवस परेश रावलचे 'सरदार' आणि 'हेराफेरी' बघितले की हे होतं. सलग दोन दिवस ओम पुरीनाही असाच बघितला. एके दिवशी 'चायना गेट' मधून नुसत्या नजरेच्या धाकातून साक्षात अमरीश पुरीला जरबेत ठेवणारा ब्रिगेडियर पुरी आणि दुसऱ्याच दिवशी टीव्हीवर 'चाची ४२० ' मधला त्याच व्यक्तिमत्वाच्या अमरीश पुरीचा लोचट आणि लाचार असिस्टंट. अर्धसत्य, तमस, घायल, नरसिम्हा, किंवा अगदी 'ओह माय गॉड' अथवा 'दुल्हन हम ले जायेंगे' सारखे टुकार सिनेमे. अगदी शाहरुख खानचा डॉन. अफाट अफाट अफाट. 'भारत एक खोज' मध्ये औरंगजेब (आणि 'शिवाजी' नासिरुद्दीन शाह, अफलातून) . ... धूप, चायना गेट, अर्ध सत्य, आक्रोश सारख्या अनेक असामान्य चित्रपटात त्यांनी नितांतसुंदर गंभीर भूमिका साकारली होती... तर चाची ४२०, मालामाल विकली, हेरा फेरी मध्ये हलका फुलका रंग भरला... त्यांच्या निधनाने अभिनयाची जाण असलेला माणूस गमावला... ... ओम पूरी श्रेष्ठ निवेदक, अभिनेता ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved